अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत.

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती
रुपाली चाकणकर,


मुंबई : राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत. तशी माहिती त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिलीय. (NCP Leader Rupali Chakankar Appoints as Chairperson of State Women’s Commission)

4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होतं. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी भाजप आणि अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. महिला सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला जात होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे राज्य सरकारवर अनेकदा टीकास्त्र डागलं आहे. अशावेळी अखेर ठाकरे सरकारनं रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित रहाटकरांचा राजीनामा

विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. आयोगाचे अध्यक्षपद हे राजकीय स्वरुपाचे नसल्याचं सिद्ध झालं आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे, त्यामुळे आता हे पद स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतल्याचं विजया रहाटकर यांनी पत्रात म्हटलं होतं.

“महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अनावश्यक राजकीय शेरेबाजीविरोधात मी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत आणि पदावरुन काढण्याबाबत आयोगाच्या कायद्यातील तरतुदींचा मुद्दा विचारार्थ ग्राह्य धरलेला आहे. एका अर्थाने आयोगाचे अध्यक्षपद राजकीय स्वरुपाचे नसून त्याबाबत राज्य सरकारला कायद्यानुसारच विहीत प्रक्रिया करावी लागेल, असेच स्पष्ट झाले आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे. त्यामुळे आता हे पद मी स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि राजीनामापत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले” अशी प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी दिली होती.

इतर बातम्या :

VIDEO: दबाव झुगारून बेकायदा बांधकामे पाडा, मी तुमच्या पाठीशी आहे; मुख्यमंत्र्यांच्या पालिकेला कडक सूचना

‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतं’, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा खळबळजनक दावा

NCP Leader Rupali Chakankar Appoints as Chairperson of State Women’s Commission

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI