पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि नवनीत राणा, रवी राणा यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले, वैयक्तिक टीकाही झाली. माध्यमांसमोर एकमेकांवर तोंडसुख घेणारे हे नेते लडाखमध्ये मात्र एकत्र न्याहरी करताना आणि गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळाले!
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार आणि सरकारला आवाहन केलं आहे. 'केतकीच्या वयाचा आणि सगळ्या बाबींचा विचार करता एक वॉर्निंग देऊन या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिला पाहिजे', असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कधी टीका टिप्पणी, तर कधी बहिण-भावाचं प्रेम दिसून आलं. डॉ. तात्याराव लहाने यांच्या मुंबईतील रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन आज पार पडलं. या कार्यक्रमात धनुभाऊंनी पंकजाताईंना डोक्यावर टपली मारल्याचं पाहायला मिळालं!
राज ठाकरे यांनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. तिथे त्यांनी अनेक पुस्तके चाळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची काही पुस्तके विकतही घेतली. तसंच तिथे उपस्थित वाचकांना त्यांनी ऑटोग्राफही दिला. मात्र, जेव्हा ते गाडीतून उतरले त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापल्याचं पाहायला मिळालं.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आता संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व आमदारांना खुलं पत्र लिहिलं आहे.
अतिरिक्त उसाचं गाळप करण्यासाठी सरकारनं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे पासून म्हणजेच मागील दोन दिवसांपासून अतिरिक्त ऊस गाळप अनुदान मिळणार आहे. उसाला 200 रुपये प्रति टन तर वाहतुकीसाठी 5 रुपये प्रति टन अशा स्वरुपात हे अनुदान असणार आहे.
भारती सिंहने आपल्या एका शो मध्ये दाढी-मिशीवर एक विनोद केला होता. त्यावर शिख समाजातील (Shikh Community) लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसंच भारतीला ट्रोलही केलं जातंय.
या निर्णयामुळे नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकांना वर्षानुवर्षे भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून बाहेर काढलं.
आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.