AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Hike: युद्धाच्या झळा, ऑटो रिक्षाची भाडेवाढ? एलपीजी गॅस दरवाढीचा भडका, तुमच्या खिशाला कात्री लागणार

LPG Price Hike: आखाती देशातील युद्धाचा रिक्षा चालकांना मोठा फटका बसला आहे. तर प्रवाशांनाही दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शहरातंर्गत प्रवासही महागणार आहे. एलपीजी गॅसवरील ऑटोची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

LPG Price Hike: युद्धाच्या झळा, ऑटो रिक्षाची भाडेवाढ? एलपीजी गॅस दरवाढीचा भडका, तुमच्या खिशाला कात्री लागणार
एलपीजी किंमत, फाईल चित्रImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 10, 2026 | 9:35 AM
Share

LPG Price Hike: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता संपूर्ण जगासह भारतालाही बसला आहे. युद्धाची झळ ग्राहकांना बसली आहे. घरगुती गॅसमध्ये दरवाढ झाली आहे. तर तुटवडा होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. त्याचवेळी आता एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. एलपीजी गॅसच्या किंमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाल्याने त्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅसवरील रिक्षाचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. शहरातंर्गत प्रवास आता महागणार आहे.

एलपीजी गॅस दरवाढीचा भडका

आखाती देशातील युद्धाचा ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसात एलपीजी गॅस दरवाढीचा भडका उडाला आहे. एलपीजी गॅसचा दर 61 रुपयावरुन थेट 75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा अशी मागणी रिक्षा चालक आणि संघटनांनी केली आहे.

नाशिकची तर्रीदार मिसळ महागण्याची शक्यता

नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ बसली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर वाढल्याने मिसळचे दर देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक गॅस काल 2200 रूपये तर आज 2400 रुपयांवर पोहचले आहेत. पैसे देऊन देखील गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. दररोज गॅसचे दर वाढत असल्याने हॉटेल चालकांची डोकेदुखी वाढली आहे.

हॉटेलसह लॉजिंग व्यवसायावर परिणाम

अमेरिका-इराण युद्धाचा थेट फटका अध्यात्मिक पर्यटन केंद्र असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला बसत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेलसह लॉजिंग व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. मागील आठवडा भरापासून आम्हाला सुरळीत गॅस मिळत नाही त्यामुळे आम्हाला लॉजिंगचे किचन बंद ठेवावे लागत आहे. याशिवाय मागील आठवड्यापासून ग्राहकांचा ओघ कमी झाला आहे. युद्धामुळे जगासह सोलापुरातील पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. सातत्याने गॅस लागतो मात्र आता गॅसचा तुटवडा जाणवत आहे. तसेच गॅसच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. पूर्वी सतराशे ते आठराशेला मिळणारा गॅस आता तेवीसशे ते चोवीसशेवर गेलाय. तसेच तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला हॉटेल बंद करण्याशिवाय पर्यायी राहिलेला नाही. गॅस सिलेंडर वेळेत मिळत नाही त्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सरकारने यात लक्ष घालून वेळीच उपाययोजना करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं