AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलेला गाठलं, गप्पा मारल्या अन् पुढच्याच क्षणी…; पुण्यातील घटना वाचून अंगावर येईल काटा

पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी ज्येष्ठ महिलेला बोलण्यात गुंतवून २ तोळ्यांची सोन्याची चैन चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खानापूर येथून तिला ताब्यात घेतले आहे.

मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलेला गाठलं, गप्पा मारल्या अन् पुढच्याच क्षणी...; पुण्यातील घटना वाचून अंगावर येईल काटा
chain snatching AI Image
| Updated on: Mar 10, 2026 | 9:40 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पुणे पोलिसांनी आपला फास आवळला आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

गुरुवारी ५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० च्या सुमारास एक वृद्ध महिला धायरी येथील डी.एस.के. गेटजवळील गणपती मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. यावेळी एका अनोळखी महिलेने त्यांना वाटेत गाठले. मला कामाचे पैसे मिळाले आहेत, असे सांगत तिने वृद्ध महिलेशी जवळीक साधली. यानंतर तिला गप्पांमध्ये गुंतवले. हा संवाद सुरू असतानाच, आरोपी महिलेने मोठ्या हुशारीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची चैन काढून घेतली आणि तिथून पसार झाली.

यानंतर काही वेळाने वृद्ध महिलेला गळ्यातील चैन गायब झाल्याचे समजले. तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या पीडित महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तपासासाठी दोन विशेष पथके तैनात केली होती. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवली.

चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली

या तपासादरम्यान निष्पन्न झाले की, हा गुन्हा खानापूर येथील दिपाली गणेश जावळकर (३७) हिने केला आहे. पोलिसांनी तातडीने खानापुरातील तालुका हवेली येथे धाड टाकून दिपालीला ताब्यात घेतले. सुरुवातीला दिपालीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतरच्या अधिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेली २ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन पोलिसांनी जप्त केली आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ