महिला शेतकरी गट होणार ‘आत्मनिर्भर’, कृषी महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

| Updated on: Oct 25, 2021 | 1:11 PM

ग्रामीण भागातील महिला गट आणि विकास सोसायट्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा अनोखा फंडा पुणे येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयाने हाती घेतला आहे. त्यामुळे उद्योगातील ज्ञान तर वाढणार आहेच शिवाय मार्केटचाही अभ्यास या ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे. यामध्ये महिला गटांनी केवळ तेलबिया आणायच्या आहेत आणि खाद्यतेल बनवून घ्यावयाचे आहे.

महिला शेतकरी गट होणार आत्मनिर्भर, कृषी महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
खाद्यतेल
Follow us on

पुणे : ग्रामीण भागातील महिला गट (women’s group) आणि  (Development Society)  विकास सोसायट्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा अनोखा फंडा पुणे येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयाने हाती घेतला आहे. त्यामुळे उद्योगातील ज्ञान तर वाढणार आहेच शिवाय मार्केटचाही अभ्यास या ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे. यामध्ये महिला गटांनी केवळ तेलबिया आणायच्या आहेत आणि खाद्यतेल बनवून घ्यावयाचे आहे. त्यामुळे खाद्यतेल कसे करतात याची प्रक्रीया लक्षात येणार असून या माध्यमातून ग्रामीण भागात हाच उद्योग सुरु करण्याची कला या गटांना मिळणार आहे.

आत्मनिर्भर भारत ही या संकल्पनेला साजेशे असे काम सध्या महात्मा फुले कृषी महाविद्यालयाने हाती घेतले आहे. तेलबियांचे दर हे कमी असतात. पण त्यावर प्रक्रीया करुन जेव्हा खाद्यतेल तयार केले जाते त्याचे दर हे गगणाला भिडलेले असतात. ग्रामीण भागात महिलांचे गट आहेत. शिवाय विविध विकास सोसायट्याही कार्यरत आहेत. अशाच संस्थासाठी हा अनोखा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॅा. सुनिल मासाळकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

महिला गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात. शिवाय या गटांचे जाळेही वाढत आहे. त्यामुळे उद्योगाची जोड मिळणे आवश्यक आहे. तेलबियांची उपलब्धता तर ग्रामीण भागात असतेच पण योग्य दिशा मिळत नसल्याने प्रक्रीया रखडते आणि कवडीमोल दरात तेलबियांची विक्री करण्याची नामुष्की ओढावली जाते. त्यामुळे हा अनोखा उपक्रम महिला गटांना नवसंजीवनी देणारा ठरणारा आहे.

ग्राहकांना दर्जा आणि महिलांच्या हाताला काम

सध्या अधिकचे पैसे खर्ची करुनही शुध्द तेलाची मागणी केली जात आहे. तेलामध्ये भेसळ नसलेल्या शुध्द तेलाची मागणी अधिक प्रमाणात आहे. ही भेसळ इतर कंपन्यामध्ये होते. मात्र, गटातील महिला हे काम करणार नाहीत. परिणामी तेलाचा दर्जा आणि मार्केटींग झाले तर गटाला अधिकचा फायदा होणार आहे. शिवाय विकतचे तेल आणण्यापेक्षा तेलबिया घेऊन या अन् खाद्यतेल घेऊन जा हा उपक्रमच महाविद्यालयाने सुरु केलेला आहे. याकरिता नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.

8 तासांत 50 किलो तेलबियांचे होणार गाळप

तेलबिया गाळप करण्याचे मशीन हे बाजारात मिळते. त्याची किंमत ही दीड लाख रुपये असून ते महिला गटांना खरेदी करणे सहज शक्य आहे. त्यामुळे 8 तासांमध्ये तब्बल 50 किलो तेलबियांचे गाळप यामधून होते. महिला गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय हे सुरुच असतात. पण महाविद्यालयाच प्रशिक्षण घेऊन महिलांना हा छोटासा उद्योग ग्रामीण भातही थाटता येणार आहे.

या तेलबियांचे होते गाळप

कृषी विद्यापीठाने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे तेलबियांचे खाद्यतेल कसे करायचे याची प्रक्रीया तर माहिती होईलच पण येथे सोयाबीन, सुर्यफूल, करडई, शेंगदाणा, जवस, तीळ, मोहरी याचे गाळप होणार आहे. प्रतिकोलो यासाठी दर आकारले जाणार आहे पण खेडेगावातील महिलांना एक उद्योग सुरु करण्यासाठी नवी संकल्पना हे कृषी महाविद्यालय घेऊन आलेले आहे. (Pune Agricultural College’s unique initiative to increase industries in rural areas)

संबंधित बातम्या :

 विम्यासाठी फळबागायत दार ‘वेटिंगवर’ या पर्यायांची अमलबजावणी करा अन् परतावा मिळवा

सोयाबीनच्या मागणीत वाढ पण दरात…? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

फळ पिक विमा योजना अन् शेतकऱ्यांना कसा मिळतो परतावा