सोयाबीनच्या मागणीत वाढ पण दरात…? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

सोयाबीन काढणी-मळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब समोर येत आहे. गत आठवड्यात राज्यात तब्बल 9 लाख क्विंटल सोयाबीनची आवक होऊन देखील मागणी वाढत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी तर होणार नाहीत हे निश्चित मानले जात आहे. मात्र, ते वाढणारही नाहीत असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करायची की, साठवणूक हा निर्णय आता शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे.

सोयाबीनच्या मागणीत वाढ पण दरात...? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 11:38 AM

लातूर : आता सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे मळणीची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, त्याच्या दरावरुन तर्क-वितर्क आजही सुरु आहेत. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला विक्रमी दर मिळाले होते. (Increase in demand for soyabean ) त्यामुळे शेतकऱ्यांच्याही आशा ह्या वाढलेल्या आहेत. मात्र, दरात कमालीची घट झाली असून सोयाबीन काढणी-मळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब समोर येत आहे.  (Soyabean process industry begins) गत आठवड्यात राज्यात तब्बल 9 लाख क्विंटल सोयाबीनची आवक होऊन देखील मागणी वाढत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी तर होणार नाहीत हे निश्चित मानले जात आहे. मात्र, ते वाढणारही नाहीत असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करायची की, साठवणूक हा निर्णय आता शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे.

आतापर्यंत सोयाबीनची आवक ही मर्यादीत होती. त्यामुळे दर हे 4700 पासून ते 5100 प्रति क्विंटल मिळत होते. पण आता दोन दिवसांपासून पुन्हा सोयाबीनची आवक वाढलेली आहे. भविष्यात ती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना भीतीचे कारण नाही कारणा आता सोयाबीन खरेदीसाठी स्टॅाकिस्ट, सट्टेबाज आणि प्रक्रीया प्लॅट्सधारक हे उतरत आहेत. त्यामुळे आवक वाढली तरी दरावर त्याचा परिणाम होणार नाही.

सोयाबीनचा दर्जाही सुधारला

मध्यंतरीच्या पावसामुलळे सोयाबीन हे डागाळलेले होते तर भिजलेल्या अवस्थेतच सोयाबीनची काढणी झाली होती. सोयाबीन भिजल्याने त्यामध्ये हवेचे प्रमाण अधिक होते. अशा निकृष्ट दर्जाच्या मालाला बाजारत कवडीमोल किमंत मिळते. म्हणून शेतकऱ्यांनी सध्या पडत असलेल्या ऊनाचा फायदा घेत सोयाबीन चांगल्या प्रकारे वाळवले आहे. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण हे आतात 10 ते 12 वर आले आहे. त्यामुळे या सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

सोयाबीनची आवकही वाढणार अन् मागणीही

खऱ्या अर्थाने सोयाबीनची काढणी आता पूर्ण झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांची काढणी-मळणीची कामे ही रखडली होती. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनची मळणी कामे झाली आहेत. दिवाळी सण तोंडावर आहे आणि शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. त्यामुळे सोयाबीनची आवक या आठवड्यात वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आवक वाढली तरी मागणीही वाढणार आहे. कारण बाजारपेठेत स्टॅाकिस्ट, सट्टेबाज आणि प्रक्रीया प्लॅट्सधारक हे माल खरेदीसाठी उतरलेले आहेत. त्यामुळे दरात वाढ झाली नाही तरी दर स्थिर राहतील असाच अंदाज आहे.

दररोज होतेय 9 लाख क्विंटल सोयाबीनची आवक

गेल्या सहा दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 5 हजारावर स्थिर राहिलेले आहेत. किमान दराच घसरण तर झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विक्रीवर भर असल्याचे निदर्शनास येत आहे. शिवाय रब्बीच्या पेरणीची तयारी आणि आगामी काळात दिवाळी सण यामुळे भविष्यात तर सोयाबीनचे दर याहून घसरले तर अधिकचे नुकसान कशाला म्हणून सोयाबीनची आवक वाढत आहे. राज्यातील अकोला, लातूर, मध्यप्रदेशातील इंदोर येथे आवक वाढली असून गत सप्ताहात तब्बल 9 लाख क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. (Soyabean demand increases but rates remain stable, relief as process industry starts)

संबंधित बातम्या :

फळ पिक विमा योजना अन् शेतकऱ्यांना कसा मिळतो परतावा

काय आहे ‘कृषी कर्ज मित्र’ योजना ? शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणर कर्ज

कृषी यांत्रिकरणाचा लाभ घ्यायचा आहे ? मग असा करा अर्ज अन् मिळवा योजनेचा लाभ

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.