सोयाबीनची आवकही घटली ; दरही स्थिर, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

| Updated on: Sep 30, 2021 | 2:27 PM

गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयबीनला पोटलीत 5900 दर मिळालेला आहे. विशेष: म्हणजे केवळ 2000 हजार क्लिंटल सोयाबीनची आवक असून ही स्थिती असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे उडदाला अपेक्षित दर मिळत असून ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.

सोयाबीनची आवकही घटली ; दरही स्थिर, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : पेरणीपासून संकटात असलेले सोयाबीन आता बाजारात दाखल होत आहे. पण सोयाबीन आवक आणि मिळत असलेला दर हे शेतकऱ्यांची चिंता वाढणारा आहे. मुख्य पिक असूनही यंदा शेतकऱ्यांना अपेक्षितप्रमाणे उत्पादन तर झालेच नाही शिवाय दरही निम्म्याने घटलेले आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांचे पीक हे शेतातच आहे पावसामुळे उत्पादनात तर घट ही होणारच आहे पण बाजारात दर वाढत नाहीत. गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयबीनला पोटलीत 5900 दर मिळालेला आहे. विशेष: म्हणजे केवळ 2000 हजार क्लिंटल सोयाबीनची आवक असून ही स्थिती असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे उडदाला अपेक्षित दर मिळत असून ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.

लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून आणि कर्नाटकातून सोयाबीनची आवक होत असते. पण यंदा पावसाने सोयाबीनची काढणी ही रखडलेली आहे. शिवाय योग्य दर नसल्याने शेतकरी बाजाराकडे पाठ फिरवत आहे. दरवर्षी सोयाबीनचा हंगाम सुरु झाला की, दिवसाला 40 ते 50 हजार क्विंटल सोयाबीनची आवक ही होत असते. पण यंदा 20 हजार पेक्षा जास्त आवक झालेली नाही.

बाजारपेठेत कमालीची शांतता असून शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती दर वाढीची. उडदाला मात्र, यंदा चांगला दर मिळालेला आहे. आवक सुरु झाल्यापासून 7000 च्या दरम्यान मिळालेला दर आजही कायम आहे. उडदाची काढणी ही पावसाला सुरवात होण्यापुर्वी झाली होती तर अजूनही उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील उडीद हा वावरातच आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. तेलावरील आयातशुल्क कमी करूनही दर हे घटलेलेच आहेत.

सोयाबीन दरात घट, तरीही तेलाच्या दरात तेजी कायम

सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयाशुल्क हे कमी केले होते. त्यामुळे किमान 5 ते 10 रुपयांनी दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बाजारपेठेतले चित्र हे वेगळे आहे. खाद्य तेलाचे दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत. ऐन सणासुदीमध्ये दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागणार आहे. सर्वच तेलांच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीन हे 5800 वर येऊन ठेपले आहे. सोयाबीनचे दर पडण्यात केंद्र सरकारलाच जबाबदार धरले जात आहे.

उडीदाने शेतकऱ्यास तारले

सोयाबीन, उडीद ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. या दोन पिकावरच शेतकऱ्यांची भिस्त असते. पण यंदा पावसामुळे आणि केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. उडदाला योग्य दर मिळाला आहे. पण पावसामुळे काही भागातील उडीद हा काळवंडलेला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना सरासरी 7000 चा दर मिळालेला आहे. त्यामुळे किमान चार पैसै तरी शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरवारी लाल तूर- 6540 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6425 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6527 रुपये क्विंटल, जानकी चना 5200 रुपये क्विंटल, विजय चणा 5250, चना मिल 5000, सोयाबीन 6800, चमकी मूग 6700 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता. (Soyabean arrivals fall in latur market, rates stable, farmers worried)

संबंधित बातम्या :

कधी ढगफुटी, कधी दुष्काळ, शेतीचं मोठं नुकसान टाळण्यासाठी पठ्ठ्याने स्वत:च शेतात हवामान केंद्र उभारलं!

72 तासानंतरही पिक पाण्यात, कसा करणार नुकसानीचा दावा ? काय आहे पर्याय

जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे हजारोंचे अनुदान, असा करा अर्ज