जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे हजारोंचे अनुदान, असा करा अर्ज

आता जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची कल्पना होत नाही पण गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये हे राज्य सरकार अनुदान देत आहे. शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत 3 फेब्रुवारी पासून या योजनेला सुरवात झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या योजनेबाबत...

जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे हजारोंचे अनुदान, असा करा अर्ज
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : शेती अवजारे, सिंचन आणि पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यावर सरकारकडून अनुदान दिले जाते. एवढच नाही तर आता जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची कल्पना होत नाही पण गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये हे राज्य सरकार अनुदान देत आहे. शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत 3 फेब्रुवारी पासून या योजनेला सुरवात झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या योजनेबाबत…
आजही शेतकऱ्यांच्या जनावारांना योग्य निवारा नसतो. निवाऱ्याअभावी शेतकरी पशुपालनाकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे नव्याने सुरु करण्यात आलेल्या योजनेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दुग्ध व्यवसाय हा शेतीचा प्रमुख जोड व्यवसाय आहे. त्यामुळे शेळी पालन, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन यामध्ये वाढ व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने जे शेतकरी शेळी पालन, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करतात त्यांना योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. सर्व जुन्या आणि नव्या योजना ह्या शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत सहभागी करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदाल दिले जाणार आहे. याकरिता अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेऊ..

अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मिळणार 77000 हजार रुपये

गाई व म्हशी अशा दोन ते सहा जनावरांसाठी गोठा बांधायचा आहे. या जनावरांच्या गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. तर सहा किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे 12 जनावरांसाठी दुप्पट तर 18 पेक्षा अधिक जनावरे असतील तर तिप्पट अनुदान हे दिले जाणार आहे.

अशा प्रकारे घ्या योजनेचा लाभ

*योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

* अर्ज करताना तुम्ही कुणाकडे म्हणजे सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यापैकी कुणाकडे अर्ज करीत आहात त्या नावापुढे बरोबर अशी खून करायची आहे.

*त्यानंतर ग्रापंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा आणि अर्जाच्या उजवीकडे तारीख टाकून तुमचा फोटे चिटकावयाचा आहे.

*त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव, पत्ता, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

*आता तुम्ही ज्यासाठी अर्ज करीत आहात त्यावर बरोबर अशी खुन करा.

आता अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

*अर्जामध्ये तुमच्या कुटुंबाचा प्रकार म्हणजे अनुसुचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, महिलाप्रधान कुटुंब, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्प भुधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारा आपले कुटुंब आहे त्याचा उल्लेख करावा लागणार आहे.

*तुम्ही जो प्रकार निवडला त्याच्या कागपत्राचा पुरवाही जोडावा लागणार आहे.

*शिवाय लाभार्थ्य़ाच्या नावे शेतजमिन आहे का, असल्यास त्याचा सातबारा, आठ ‘अ’ आणि ग्रामपंचायत नमुना जोडायचा आहे.

*यानंतर रहिवाशी दाखला जोडायचा आहे. शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला ते काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्येच येते का, ते ही भरावे लागणार आहे.

*ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्या कुटुंबातील सदस्यसंख्या ती पण 18 वर्षा पुढील सदस्यांची संख्या नमूद करायची आहे.

*शेवटी घोषणा पत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.

*अर्जा सोबत मनरेगा जॅाब कार्ड, 8- अ, सात बारा उतारा, मालमत्ता नमुना 8 अ उतारा जोडायचा आहे.

*त्यानंतर ग्रामसभेत ठराव घ्यावयाचा आहे.

*यानंतर तुमच्या कागपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. व पंतायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही शिक्यानुसार पोचपावती दिली जाईल यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात का नाही हे सांगितले जाणार आहे.

*तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असताल तरीही लाभ घेता येईल पण जर जॅाब कार्ड नसेल तर मात्र लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जॅाब कार्डसाठी तुम्ही ग्रामपंयायतीमध्ये अर्ज करु शकता. (State Government : Farmers get subsidy for cattle herds, apply)

संबंधित बातम्या :

चवीला गोड अन् औषधी गुण असलेल्या ‘पांढऱ्या कांद्याला’ जागतिक बाजारपेठेत महत्व, गुणधर्मासह लागवड पध्दती

पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

PM KISAN YOJNA : 7 लाख 24,000 शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI