AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या बायकोसोबत राहतो राजपाल यादव…दोघांचं वय आणि उंची बद्दल जाणून व्हाल अवाक्

Rajpal Yadav: राजपाल यादव याच्या पहिल्या बायकोचं झालेलं धक्कादायक निधन... आता दुसऱ्या बायकोसोबत राहतोय अभिनेता... दोघांचं वय आणि उंचीबद्दल जाणून व्हाल अवाक्... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राजपाल याची चर्चा...

दुसऱ्या बायकोसोबत राहतो राजपाल यादव...दोघांचं वय आणि उंची बद्दल जाणून व्हाल अवाक्
अभिनेता राजपाल यादव
| Updated on: Feb 11, 2026 | 11:34 AM
Share

Rajpal Yadav: प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव मोठ्या अडचणीत अडकला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात त्याने स्वत:ला दिल्लीतल्या तिहार तुरुंगात सरेंडर (आत्मसमर्पण) केलं आहे. आत्मसमर्पण करण्याआधी तो तुरुंगातील अधिकाऱ्यांसमोर भावूक झाला होता. आता अभिनेत्याच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुढाकार घेतला आहे. उच्च न्यायालयाने अभिनेत्याला थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी अधिक वेळ देण्यास नकार दिला. हे प्रकरण 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लपाता’ या सिनेमाच्या संबंधित आहे. आता राजपाल यांच्या खासगी आयुष्याच्या देखील चर्चा रंगल्या आहे.

राजपाल यादव याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, राजपाल याने दोन लग्न केली आहेत. राजपाल याच्या पहिल्या पत्नीचं निधन मुलीला जन्म देताना झाला आहे… राजपाल यांच्या पहिल्या पत्नीचं नाव करुणा असं आहे. त्यानंतर अभिनेत्याने राधा नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं.

राजपाल यादवने मे 2003 मध्ये कॅनेडियन रहिवासी राधा हिच्यासोबत लग्न केलं. या जोडप्याला हर्षिता आणि रेहांशी या दोन मुली आहेत. यादवला त्यांच्या पहिल्या पत्नीपासून ज्योती ही एक मुलगी आहे. राधा गृहिणी आहे आणि कुटुंबाची काळजी घेते.

राजपाल यादव आणि राधा यांची उंची

रादपाल यादव कायम त्याच्या कुटुंबाला झगमगत्या विश्वापासून दूर ठेवतो. राजपाल याची उंची पत्नीपेक्षा कमी आहे. राजपाल यादव याची उंची 5 फूट 2 इंच आहे, तर त्याच्या पत्नी राधा हिची उंची 5 फूट 3 इंच आहे…

राजपाल यादव आणि राधा यांचं वय

राजपाल यादव आणि राधा यांच्यात कोण मोठा आहे हा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. राजपाल त्याच्या पत्नीपेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे. राजपाल आणि राधा यांच्या लग्नाला जवळजवळ 22 वर्ष झाली आहेत. राधा लाइमलाइटपासून दूर राहते.

राजपाल यादव प्रकरण…

2010 मध्ये राजपाल यादवने एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून त्याच्या एका सिनेमासाठी पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘अता पता लापता’ या सिनेमाचं दिग्दर्शन राजपाल करत होता. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यामुळे त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. व्याज, दंड, विलंबित देयकं यांमुळे थकबाकीची रक्कम जवळपास 9 कोटी रुपयांपर्यंत वाढली. कर्ज चुकवण्यासाठी त्याने कर्जदात्याला अनेक चेक्स दिले होते. परंतु हे चेक्स बाऊन्स झाले. त्यामुळे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू झाली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ