AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकन शोरमा खाल्यामुळे 56 जणांना विषबाधा, भिवंडीमध्ये मोठी खळबळ

भिवंडीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडी शहरात चिकन शोरमा खाल्यामुळे 15 जून दरम्यान तब्बल 107 जणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

चिकन शोरमा खाल्यामुळे 56 जणांना विषबाधा, भिवंडीमध्ये मोठी खळबळ
चिकन शोरमामधून विषबाधा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 5:29 PM
Share

भिवंडीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडी शहरात चिकन शोरमा खाल्यामुळे 15 जून दरम्यान तब्बल 107 जणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एक हादरवणारी घटना समोर आली आहे. चिकन शोरमा खाल्यामुळे आता 56 जणांना विषबाधा झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार  सोमवारी वंजारी नाका परिसरात असलेल्या एका शॉपवरून या सर्वांनी चिकन शोरमा खरेदी केला होता.

दरम्यान चिकन शोरमा खाल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर विषबाधेचा परिणाम जाणवू लागला. सुरवातीला एकाच कुटुंबातील चार जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी  स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  त्यानंतर हळुहळु ही संख्या वाढत गेली. मंगळवारी रात्री 34 जण त्रास जाणवत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. तर बुधवारी सकाळी ही संख्या 56 वर पोहोचली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार उपाचारानंतर आता सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून,  त्यांना  उलटी, जुलाब,  तापचा त्रास जाणवत आहे. अजूनही या रुग्णांवर उपचार सुरूच असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

दरम्यान शहरात जिथे-जिथे उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होते, त्या -त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. ज्यामध्ये 107 जणांना विषबाधा झाली होती.  नागरिकांनी सुद्धा उघड्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नयेत, घरातील सकस अन्न खावे. विशेष म्हणजे  एक वर्षांच्या आतील मुलांना आणि गरोदर महिलांना देखील विषबाधा झाली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे.  नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, अस्वच्छ अन्नपदार्थ खाऊ नयेत, असं आवाहान यावेळी  स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ.माधवी पंदारे यांनी केले आहे.

दरम्यान विषबाधेची ही भिवंडीमधील दुसरी घटना आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता यावर महापालिका काय कारवाई करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!