AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोपदेव घाट परिसरात भीषण अपघात! विद्यार्थ्यांच्या घोळक्यात आयशर टेम्पो घुसला; दोघांचा जागीच मृत्यू, काही जण गंभीर जखमी

Bopdev Ghat Accident Eicher Tempo Crashes Into Students: पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बोपदेव घाटात विद्यार्थ्यांच्या घोळक्यात आयशर टेम्पो घुसला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बोपदेव घाट परिसरात भीषण अपघात! विद्यार्थ्यांच्या घोळक्यात आयशर टेम्पो घुसला; दोघांचा जागीच मृत्यू, काही जण गंभीर जखमी
Eicher Tempo Rams Into Students at Bopdev Gha
| Updated on: Nov 25, 2026 | 5:22 PM
Share

पुण्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील बोपदेव घाट परिसरात बसची वाट पाहत बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात भरधाव आयशर टेम्पो घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील बोपदेव घाट परिसरात काही विद्यार्थी बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे होते. याचवेळी अचानक एक आयशर टेम्पो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. टेम्पोची धडक इतकी भीषण होती की, या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे बस थांब्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, टेम्पोचा वेग किती होता आणि अपघातामागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास केला जात आहे. या अपघातातील मृत विद्यार्थी आणि जखमींची सविस्तर ओळख तसेच अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोपदेव घाट परिसरात घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ