AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM KISAN YOJNA : 7 लाख 24,000 शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या

7,24,042 शेतकऱ्यांचे पैसे हे जमा झालेले नाहीत. तर 49,76,579 शेतकरी अद्यापही प्रलंबित आहेत. अर्ज करूनही पैसे जमा करुनही होत नाहीत तेव्हा काय होते, असा प्रश्न उपस्थित होतो. कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरताना योग्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

PM KISAN YOJNA : 7 लाख 24,000 शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 6:25 PM
Share

मुंबई : पंतप्रधानांच्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात 10,40,28,677 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये पाठविले आहेत. आता दहावा हप्ता खात्यामध्ये जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचे पैसे 10 ते 15 डिसेंबर दरम्यान जाहीर होतील. असे असले तरी 7,24,042 शेतकऱ्यांचे पैसे हे जमा झालेले नाहीत. तर 49,76,579 शेतकरी अद्यापही प्रलंबित आहेत. अर्ज करूनही पैसे जमा करुनही होत नाहीत तेव्हा काय होते, असा प्रश्न उपस्थित होतो. कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरताना योग्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज करूनही पैसे जमा होत नाहीत. थोडीशी चूकही या रकमेपासून वंचित ठेऊ शकते.

33 महिन्यांत 1.58 लाख कोटी नफा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू होऊन 33 महिने झाले आहेत. डिसेंबर 2018 पासून या योजनचे सुमारे 120 दशलक्ष लाभार्थी आहेत. शेती सुलभ करण्यासाठी 1.58 लाख कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात आले आहेत. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत. कारण त्यांच्या नोंदीत काहीतरी गडबड आहे. एकतर शेतकरी यांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही किंवा सुचनांचे पालन केलेले नाही. शिवाय अनेक शेतकरी हे काळजीपूर्वक फॉर्म भरत नाहीत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही.

लाभ घेण्यासाठी हे लक्षात असू द्या

या योजनेअंतर्गत स्वत: ऑनलाइन अर्ज करताना फॉर्म पूर्णपणे आणि बरोबर भरा. कारण सरकारी यंत्रणेत आता उलट-तपासणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे तुमच्या अर्जाची तपासणी होते. बँक खाते क्रमांक(बँक खाते) तसेच आयएफएससी कोड योग्य प्रकारे भरा. सध्याच्या स्थितीत असलेला खाते क्रमांक भरा. जमिनीचा तपशील – विशेषत: खात्याचा क्रमांक खूप काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे

या बाबींमुळे पैसे जमा झाले नसतील ते तपासून पहा

– अवैध खात्यामुळे तात्पुरते थांबवलेले असतील. पण खात्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्यावर पैसे जमा होणार आहेत. – तुम्ही दिलेला खाते क्रमांक बँकेतच नव्हता. याचा अर्थ चुकीचा खाते क्रमांक भरला आहे. – वित्त व्यवस्थापन यंत्रणेनेाध्ये तुमचा सहभागच झालेला नसेल तरीपण पैसे जमा होत नाहीत. – बँकेने जर तुमचे खाते अमान्य केले तरी पैसे जमा होणार नाहीत. – पीएफएमएस/ पीएफएमएस बँकेने शेतकरी नोंदी नाकारल्या आहेत. – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आधार (आधार कार्ड) जमा केले गेले नाही. – राज्य सरकारच्या वतीने दुरुस्ती प्रलंबित असेल तरी पैसे हे जमा होत नाहीत.

6000 रुपयांचा लाभ कोणाला मिळू शकत नाही

(१) पूर्वी किंवा सध्या घटनात्मक पद भूषविणारे शेतकरी विद्यमान किंवा माजी मंत्री आहेत. (२) महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार. (४) केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी त्यापासून दूर राहतील. (५) गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. (६) ज्या शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते, त्यांनाही लाभ होत नाही. (७) व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील आणि आर्किटेक्ट हे योजनेबाहेर असतील. Due to these shortcomings, your Pradhan Mantri Kisan Samman Yojana money has not been credited to the account… Know

संबंधित बातम्या :

जगात महाराष्ट्राचा कांदा लई भारी, तुम्ही कमाऊ शकता लाखो रुपये

सोयाबीनची आवक वाढली, दर स्थिरच, शेतकऱ्यांनी योग्य दराची प्रतिक्षा करावी

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....