AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाच्या खेळाडूवर वर्ल्ड कप विजयानंतर माफी मागण्याची वेळ, व्हीडिओ व्हायरल

Icc T20i World Cup 2026 Final : न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारताचे खेळाडू आणि चाहते टी 20i वर्ल्ड कप विजयाचा एकच जल्लोष साजरा करत होते. तर दुसऱ्या बाजूला हा खेळाडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूची माफी मागत होता.

IND vs NZ : टीम इंडियाच्या खेळाडूवर वर्ल्ड कप विजयानंतर माफी मागण्याची वेळ, व्हीडिओ व्हायरल
Indian Cricket Team T20i World Cup 2026Image Credit source: ICC
| Updated on: Mar 10, 2026 | 1:12 AM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर जबरदस्त असा विजय मिळवून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केल. भारताने अशाप्रकारे हा सामना 96 धावांनी जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूवर ऑन कॅमेरा माफी मागण्याची वेळ आली. या खेळाडूचा माफी मागतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नक्की प्रकरण काय झालं होतं? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप फायनलमधील विजयानंतर न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेल याची जाहीर माफी मागितली. अर्शदीपने सामन्यानंतर डॅरेलकडे जाऊन त्याने केलेल्या कृतीबाबत खेद व्यक्त केला. अर्शदीपने दिलगिरी व्यक्त केली. डॅरेलने खिलाडूवृत्ती दाखवत अर्शदीपला मोठ्या मनाने माफ केलं. अर्शदीपने डॅरेलची माफी मागितल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र अर्शदीपने डॅरेलची माफी मागायला नक्की केलं तरी काय होतं? हे जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडची बॅटिंग सुरु होती. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने न्यूझीलंडच्या डावातील 11 वी ओव्हर टाकत होता. अर्शदीपने या ओव्हरमधील पाचवा बॉल टाकला. मिचेलने बॉलला बॅटने स्पर्श केला. अर्शदीपने तो बॉल उचलला आणि मिचेलच्या दिशेने जोरात फेकला. मात्र अर्शदीपचा अंदाज चुकला. मिचेल स्टंपसमोर नसतानाही अर्शदीपने वेगात तो बॉल फेकला. अर्शदीपने फेकलेल्या बॉलचा मिचेलला जोरात फटका बसला. अर्शदीपने हे असं जाणिवपूर्वक केलं नाही. मात्र असं करण्याची गरज नव्हती.

बॉलचा फटका लागल्याने मिचेल संतापला. मिचेलने अर्शदीपच्या पाठीमागे जात त्याने केलेल्या या कृतीबाबत जाब विचारला. मात्र अर्शदीपला आपण चूक केल्याचं जाणवलं. त्यामुळे अर्शदीपकडेही ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. तापलेल्या मिचलेला अंपायरने समजवलं. तसेच अंपायरने अर्शदीपची कानउघडणी केली. तर दुसऱ्या बाजूला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने मिचेलला समजवलं. त्यामुळे विषयाला तिथेच पूर्णविराम मिळाला.

अर्शदीपकडून डॅरेचली माफी

मात्र अर्शदीपला आपण चूकीचं केल्याचt जाणिव झाली. अर्शदीप सामन्यानंतर डॅरेलच्या जवळ गेला. अर्शदीपने त्यानंतर डॅरेलची माफी मागितली. डॅरेलनेही अर्शदीपची चूक मान्य करत दिलदारपणा दाखवत त्याला माफ केलं.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार