AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CET मध्येही महाघोटाळा ? त्या आरोपांत काही तथ्य नाही, CET सेलकडून खंडन;आयुक्तांनी सगळं स्पष्टच सांगितलं

NEET नंतर MHT-CET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे आरोप विरोधकांनी केले. एका शिक्षकाच्या व्हायरल व्हिडिओमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र CET सेलने हे आरोप फेटाळले असून, टक्के आणि पर्सेंटाइलमधील फरक तसेच विद्यार्थ्यांच्या प्राधान्यांमुळे गुणसंख्येत फरक दिसतो, असे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.

CET मध्येही महाघोटाळा ? त्या आरोपांत काही तथ्य नाही, CET सेलकडून खंडन;आयुक्तांनी सगळं स्पष्टच सांगितलं
CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई
| Updated on: Jul 28, 2026 | 2:39 PM
Share

NEET पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) केलेलं आंदोलन देशभरात गाजलं. त्यावरून सुरू झालेला गदारोळ शिक्षणमत्र्यांच्या राजीनाम्यानंतर जरा थंडावला. ते प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता राज्यात NEET पेक्षाही MHT-CET मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे.  राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवरून शेअर केला आहे. त्यात एका शिक्षकाने एमएच-सीईटी 2026 मध्ये कसा महाघोटाळा झाला याविषयी भाष्य केल्याने परत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता याप्रकरणावर CET सेलने मौन सोडलं असून पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं म्हणत CET सेलचे आयुक्त सरदेसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काही विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना सीईटी परीक्षेत जास्त गुण असतात. दोन परीक्षांमध्ये तुलना करण चुकीचं आहे. टक्के आणि पर्सेंटाईल यांची तुलना चुकीची असल्याचं सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितलं. सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने अंतर्गत विश्लेषण करण्यात येणार आहे, त्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ,  असंही त्यांनी नमूद केलं.

काय म्हणाले सीईटी सेलचे आयुक्त ?

एका परीक्षेत असलेल्या परफॉर्मन्सप्रमाणे दुसऱ्या परीक्षेतही तसाच परफॉर्मन्स दिला पाहिजे ही अपेक्षा काही योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सेंटाइल आणि पर्सेंटेज या दोन्ही पद्धती वेगळ्या आहेत. पर्सेंटाइल पद्धती ही त्या त्या बॅचसाठी असते, त्यामध्ये जो टॉपर असतो, त्याला 100 पर्सेंटाइल म्हणतात. त्या रॉ स्कोअर 70, 80ल किंवा 90 टक्के, कितीही असू शकतो. पण तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाइल म्हणतात. याचा अर्थ असा नव्हे की 100 टक्के मार्क मिळालेत, असं आयुक्त सरदेसाई म्हणाले.

MHT-CET मध्ये अनियमितता झाल्याचादावा सरदेसाई यांनी फेटाळून लावला आहे.सोशल मीडियावर जे दावे करण्यात येत आहेत, ते दिशाभूल करणारे असल्याचं स्पष्टीकरण सरदेसाई यांनी दिलं. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असंही ते म्हणाले.  या दाव्यांबद्दल  CET सेलकडून  आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे. तसेच पोलीस, सायबर विभागाकडे चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच