मोठी बातमी! भुजबळांकडून एक घाव दोन तुकडे, जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपबद्दल सर्वात मोठा दावा
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकवली, या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या ऑडिओ क्लिपवर मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली, या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या ऑडिओ क्लिपवरून आता महायुतीमध्येच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. या ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांची या ऑडिओ क्लिपवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
देवेगिरी या शासकीय निवासस्थानी मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपबद्दल मोठा दावा केला आहे. ती ॲाडीयो क्लिप कपोलकल्पित आहे, असं म्हणत भुजबळ यांनी एका वाक्यात हा विषय संपवला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अर्थमंत्रिपदासाठी आग्रही आहे, यावर देखील यावेळी मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार या आमच्या उपमुख्यमंत्री आहेत, अर्थखाते आम्हाला परत मिळायलाच हवं, ते आमचं हक्काचं खातं आहे. ते अर्थखातं पुन्हा देणार होते, मुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दाखवली आहे. अमित शाह यांनी देखील यासंदर्भात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे नक्कीच सकारात्मक विचार होईल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाची देखील चर्चा सुरू आहे. यावेळी भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनिकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनिकरणाची कोणतीही चर्चा नसल्याचं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थमंत्रिपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीला अर्थमंत्रिपद मिळणार का? हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.
