छगन भुजबळ
छगन चंद्रकांत भुजबळ... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट), शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात, राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे नेते अशी भुजबळांची ओळख. धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या खात्यावर नाराज छगन भुजबळ यांचं २० मे रोजी पुनर्वसन. बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्या अन्न व नागरी पुरवठा खात्यावर छगन भुजबळांची वर्णी.
Read Moreत्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी… छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांना प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. गणेशोत्सवाच्या गर्दीत मुंबईत आंदोलन केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भुजबळ यांनी जरांगेंच्या आंदोलन पद्धतीवरही टीका करत त्यांनी आपली भूमिका लोकांना समजावून सांगावी असे म्हटले.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 16, 2026
- 6:08 pm
पुढं काय होतं ते बघू… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भुजबळांचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही९ मराठीच्या स्टु़डिओमध्ये बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, त्यांची तब्येतीची आधी काळजी घ्यावी. आम्हालाही त्यांच्या तब्येतीची काळजी आहे.
- Sunil Late
- Updated on: Sep 16, 2026
- 7:43 pm
भुजबळ पुन्हा मैदानात! जरांगेना कुणबी प्रमाणपत्राचे आश्वासन मिळताच आक्रमक, म्हणाले आता खाडाखोड केलेले दाखले…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी जाऊन महायुतीच्या नेत्यांनी काही आश्वासनं दिली. या आश्वासनानंतर छगन भुजबळ यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 4, 2026
- 2:59 pm
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
मोठी बातमी समोर येत आहे, आज ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होती. मात्र या बैठकीवर ओबीसी मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. मंत्री छगन भुजबळ, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांनी बैठकीवर बहिष्कार घातला.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 1, 2026
- 4:49 pm
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे… भर मंचावरून छगन भुजबळांचा महाजनांना टोला, नेमकं काय म्हणाले?
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात आले, अशी टोलेबाजी छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी सुचवले की, मुख्यमंत्र्यांनी दर महिन्याला नाशकात यावे, जेणेकरून सर्व रस्ते कायमस्वरूपी चांगले राहतील. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 28, 2026
- 5:47 pm
एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी निर्णायक मराठा आरक्षण आंदोलन करणार आहेत. सरकारचे शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच जरांगे यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठ्यांना किती दिवस वेड्यात काढणार, असा सवाल त्यांनी केला.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 24, 2026
- 12:14 pm
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. येवला येथे बोलताना त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गैरहजेरीबाबतही स्पष्टीकरण दिले. प्रशांत किशोर हे कधी आम्हालाही भेटतात. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार होऊन त्यांची नियुक्ती झाली असे मला वाटत नाही, असे भुजबळ म्हणाले.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 8, 2026
- 1:43 pm
तटकरे- पटेलांविरोधात पुन्हा नाराजीचा सूर, राष्ट्रवादीत मोठा गोंधळ, आता भुजबळ म्हणाले की…
Chhagan Bhujbal Statement: राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वक्तव्यानंतर चव्हाट्यावर आला. त्यांनी तटकरे आणि पटेलांवर तोंडसुख घेतले. प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वादंग उठल्याचे समोर येत आहे. या घडामोडींवर भुजबळांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 8, 2026
- 1:33 pm
Sunetra Pawar : तर भविष्यात आम्ही…तुम्ही जर…’गुंगी गुडिया’वरून भुजबळांचा संताप; काँग्रेस टार्गेटवर; राजकारण तापणार?
आमच्या पक्षाचे लोक काँग्रेसच्या कार्यालयात गेले. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. यापुढे मात्र एक लक्षात ठेवावं. तुम्ही जर आमच्या नेत्यांबाबत असं काही बोलत असाल तर भविष्यात आमचे लोक गप्प बसरणार नाहीत, असा इशाराच भुजबळ यांनी दिला.
- Prajwal Dhage
- Updated on: Aug 4, 2026
- 7:05 pm
मोठी बातमी! …तर हे घडलंच नसतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अखेर शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, यावर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यावरून त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jul 26, 2026
- 4:00 pm
अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?
Chhagan Bhujbal Big Statements: अजितदादांची आज जयंती आहे. शासकीय कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, शाळांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा त्यांना आदरांजली वाहिली. त्याचवेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 22, 2026
- 1:28 pm
छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
माझ्या पराभवाला महायुतीचे नेते जबाबदार असून त्यांनी माझा घात केला आहे, असा आरोप दराडेंनी केला. यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 22, 2026
- 3:43 pm