AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahatma Phule: तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; राज्यात संतापाची लाट, छगन भुजबळ आक्रमक, आंबेडकरांचा RSS वर निशाणा

Statue of Mahatma Jyotiba Phule Vandalised in Telangana: तेलंगणा राज्यात समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याप्रकरानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि समता परिषदेचे छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.

Mahatma Phule: तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; राज्यात संतापाची लाट, छगन भुजबळ आक्रमक, आंबेडकरांचा RSS वर निशाणा
महात्मा फुले, छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 2:45 PM
Share

Chhagan Bhujbal Aggressive on Telangana Incident: तेलंगणामध्ये समाजकंटकांनी महात्मा जोतिबा पुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असताना काही समाज कंटकांनी हा प्रकार केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पण या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली. समाजकंटकांना अटक करण्याची आणि कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. या सर्व घटनेवर राज्यातही संताप व्यक्त होत आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.

नेमकी घटना काय?

संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर या गावातील ही घटना आहे. समाजकंटकांमुळे इथं बराच काळ तणाव दिसून आली. कायदा सुव्यवस्था बिघडली. समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा आणि तो हलवण्याचा प्रयत्न केला. समाजकंटकांच्या या कृतीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. आंदोलनांतील काही जणांनी आणि पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. यावेळी समाजकंटकांचा निषेध करण्यात आला.

प्रकाश आंबेडकरांचा RSS वर हल्लाबोल

या घटनेवर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा केवळ महात्मा जोतिबा फुले यांच्यावर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. संघाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. संघाचं केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवरील आघात आहे, असा प्रहार त्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना तेलंगणात अशा घटना वारंवार घडत असताना तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात, असा सवाल केला आहे.

सामाजिक समतेवरच घाला

तर या घटनेवर समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले. महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला सुरू असल्याचा आरोप करत महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक झाले. महात्मा फुले पुतळा विटंबना प्रकरण अमित शाहांकडे तातडीच्या कारवाईची मागणी त्यांनी केली .महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला असल्याचे मत भुजबळांनी व्यक्त केले.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?