AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...

आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट…

| Updated on: Jul 28, 2026 | 11:07 AM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नीट परीक्षेनंतर आता CET आणि MPSC परीक्षांबाबतही आरोप आणि संशय व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नीट परीक्षेनंतर आता CET आणि MPSC परीक्षांबाबतही आरोप आणि संशय व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, “पेपरफुटला हे राज्याचे मुख्यमंत्री मान्य करणार नाहीत. पेपरफुटीचे लाभार्थी हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. नीटचा पेपर फोडणारे भाजपचेच लोक आहेत. मुख्यमंत्र्यांनी मान्य करावं पेपर फुटला. सगळ्याच गोष्टीत महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.”

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओचाही उल्लेख केला. “जंतर-मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी मोदींच्या व्हिडिओवर, भाषणावर हास्य-जत्रा सुरु केली. आमचे मुख्यमंत्री बोलतात कोट्यवधी लोकांनी पाहिला. इतक्या मिलियन लोकांनी शिव्या घातल्या ते पण पहा,” असे राऊत म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी, “जंतर-मंतरवरच्या डिजिटल मास्टर मुलांकडून शिकलं पाहिजे. या देशाने खरी डिजिटल इंडिया तिथे पाहिली. भाजपच्या आयटी सेलला टाळं लावावं लागलं,” अशी टीका केली. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 28, 2026 11:07 AM

Follow Us