AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल

मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल

| Updated on: Jul 28, 2026 | 10:10 AM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर आता कॉमेडियन कुणाल कामरा, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्याविरोधात चंदीगड येथील सीजीएम (मुख्य न्यायिक दंडाधिकारी) न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

15 जुलै रोजी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा यांनी भगवान राम आणि माता सीता यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने संबंधित वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

या याचिकेवरील पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार असून, न्यायालयाच्या निर्देशांनंतर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याचिकेतील आरोपांवर संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Published on: Jul 28, 2026 10:10 AM

Follow Us