पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

खरीपातील सर्व पिके ही पाण्यात आहेत. आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती नुकसान भरपाईची. नुकसान भरपाईच्या अनुशंगाने गावागावात वेगवेगळी चर्चाही असते. यामुळे नेमका पिकांचा पंचनामा म्हणजे काय? आणि कोणती प्रक्रिया केल्यानंतर आपण नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात हे कायम असतात. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कशी असते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी
कळंब तालुक्यातील खरीपातील पिकांची पावसामुळे झालेली अवस्था

लातुर : मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपातील सर्व पिके ही पाण्यात आहेत. आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती नुकसान भरपाईची. नुकसान भरपाईच्या अनुशंगाने गावागावात वेगवेगळी चर्चाही असते. यामुळे नेमका पिकांचा पंचनामा म्हणजे काय? आणि कोणती प्रक्रिया केल्यानंतर आपण नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात हे कायम असतात. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कशी असते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

1) जास्तीचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग तसेच महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातात

2) पिकाची पेरणी झाली की, त्या पिकाची विमा रक्कम अदा करणे आवश्यक आहे. पिकानिहाय ही रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेली असते.

3) पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या संबंधिची माहिती ही कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांना देणे आवश्यक आहे. यानंतर पिक पाहणीसाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. आता मात्र, सरसकट नुकसान झाल्याने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

4) या दरम्यान शेतकऱ्याजवळ सातबारा उतारा, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे.

5) पिक पेऱ्याचे क्षेत्र, बाधित क्षेत्र तसेच तुलनेने किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल या कर्मचाऱ्यांकडून तयार केला जातो.

6) पिक पंचनाम्याचा अहवाल हा महसूल विभागाकडे पाठविला जातो.

7) महसूल विभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल हा संबंधित कंपनीकडे पाठविला जातो. मात्र, नुकसान भरपाईसाठी लागवडीच्या क्षेत्रापैकी किमान 25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक आहे.

8) नुकसान अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या बॅंक पासबुकच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम वर्ग केली जाते. पंचनामा कसा केला जातो याची माहिती तलाठी सुदर्शन पाटील यांनी दिली आहे.

ऑनलाईनद्वारे नुकसानीची माहिती भरण्याचे अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, शेतामध्ये पाणी साचल्याने पंचनामे करण्याच्या प्रक्रीयेस अडचणी निर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

अतिवृष्टीमुळे सर्रास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे किंवा पिकांची पाहणी करण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळ नाही. आता नु्कसानीनंतर हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली असावी. त्यामुळे अधिकतर हे अॅप कार्यरत होत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे तर हे अशा प्रकारचे अॅपच नसल्याने अडचणी वाढत आहेत.

पावसाचे पाणी साचल्याने अडसर

सोयाबीन ऐन बहरात असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात अधिकचा पाऊस झाला होता. शेतजमिन ही चिबडली होती. शिवाय नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना नुकसानीचा दावा करावा लागणार आहे. पण पावसाचे पाणी शेतात साचल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासही अडचण निर्माण होत आहे. (The panchnama process is such that important news for the affected farmers…)

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं, ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला!

PM KISAN YOJNA : 7 लाख 24,000 शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या

जगात महाराष्ट्राचा कांदा लई भारी, तुम्ही कमाऊ शकता लाखो रुपये

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI