चवीला गोड अन् औषधी गुण असलेल्या ‘पांढऱ्या कांद्याला’ जागतिक बाजारपेठेत महत्व, गुणधर्मासह लागवड पध्दती

मुबलक पाणी आणि दर्जेदार जमिन असल्यास या कांद्याची लागवड फायदेशीर ठरत आहे. शिवाय या कांद्याला भौगोलिक निर्देशांक अर्थात (जीआय) देण्याचे संकेत केंद्र सरकारच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकचे महत्व मिळणार आहे..कांद्याची लागवड महाराष्ट्रात केली जाते पण पांढऱ्या कांद्याची काय किमया आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

चवीला गोड अन् औषधी गुण असलेल्या 'पांढऱ्या कांद्याला' जागतिक बाजारपेठेत महत्व, गुणधर्मासह लागवड पध्दती
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्र जगात भारी ठरत आहे. कांदा म्हणलं की समोर येती ती (Nashik) नाशिकची बाजारपेठ. पण आता पांढऱ्या कांद्याचीही मागणी वाढत आहे. देशातच नाही तर परदेशातूनही या (Alibag Onion) अलिबागच्य़ा पांढऱ्या कांद्याची मागणी होत आहे. मुबलक पाणी आणि दर्जेदार जमिन असल्यास या कांद्याची लागवड फायदेशीर ठरत आहे. शिवाय या कांद्याला भौगोलिक निर्देशांक अर्थात (जीआय) देण्याचे संकेत केंद्र सरकारच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकचे महत्व मिळणार आहे..कांद्याची लागवड महाराष्ट्रात केली जाते पण पांढऱ्या कांद्याची काय किमया आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा पांढरा कांदा नवसंजीवनी ठरत आहे. या कांद्याला आता देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणे शक्य होणार आहे. त्यामुळे लाल कांद्यापेक्षा हा पांढरा कांदा अधिकचा भाव खाणार हे नक्कीय. त्यामुळे मुबलक पाणी योग्य शेतजमिन असल्यास या कांदा लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पादन तुमच्या पदरी पडणार आहे. आता सध्या अलिबागतह जळगाव, धुळे भागांत या कांद्याची लागवड होते.

कधी करायची लागवड आणि काय आहे दर?

देशात पांढरा, लाल, पिवळा असे तीन रंगाचे काद्याचे प्रकार आहेत. चवीला गोड आणि औषधी गुणधर्म असल्याने कांद्याला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्य़ातील बाजारात चढय़ा दराने याची विक्री केली जाते. भातकापणी झाल्यानंतर लगेच कांद्याची लागवड केली जाते. ऑक्टोंबर ते जानेवारी हा लागवडीचा कालावधी आहे. साधारणपणे फेब्रुवारीच्या सुरुवातीला कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मे अखेपर्यंत हा कांदा बाजारात विकला जातो. दर्जेदार कांद्याला किलोमागे 75 रुपयांपर्यंतचा दरही मिळतो. त्यामुळे अलिबाग परिसरातील शेतकरी भातशेतीनंतरचे दुबार पीक म्हणून कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड करत असतात.

पोफक वातावरण

कांद्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक केली जाते. मात्र पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिला जात आहे. कांदा लागवडीसाठी वाफा आणि मल्चिंग पद्धतीचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळणार आहे. याशिवाय पाणी पुरवठय़ासाठी सेंद्रिय खत, दर्जेदार बियाणे, ठिबक सिंचन आणि स्प्रिंक्लर पद्धतीचा वापर आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकरी चोवीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे.

ही आहेत पांढऱ्या कांद्याची वैशिष्टे

पांढऱ्या कांद्या खाण्यास गोड आणि त्यामध्ये औषधी गुणधर्म असा दुहेरी फायदा होत असल्याने ग्राहकांचा ओढा त्याकडे वाढला आहे. निर्जलीकरण, पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी वापर केला जात असल्याने पांढऱ्या कांद्याचे महत्व वाढत आहे. आयुर्वेदात कांदा हा गुणकारी मानला गेला आहे.

हे ही जाणून घ्या

ऊन लागल्यावर पांढऱ्या कांद्याचा रस अंगाला लावला जातो. शरीरात ऊर्जा वाढविणे, झोप लागणे तसेच क्षयरोग, हृदयरोग, मूळव्याध आदींवर कांदा गुणकारी मानला आहे. कांद्यात ग्लुटामिन, अर्जीनाइन, सिस्टम, सेपोनिन ही रसायने असतात. अ, ब व क जीवनसत्त्व त्यात असते. खनिजेही त्यात असतात. त्यामुळे त्याला आहारात महत्त्व आहे. जळगाव, धुळे भागांत या कांद्याची लागवड होते. तर नागपूर, वर्धा, अकोला येथील बाजारात पांढरा कांदा विकला जातो. (Onions with sweet and medicinal properties of taste are important in the global market)

संबंधित बातम्या :

PM KISAN YOJNA : 7 लाख 24,000 शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या

पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

दुष्काळी मराठवाड्यात चमत्कार, हजारो फूट बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI