Agricultural : पंचनाम्याचे परफेक्ट नियोजन, कृषी मंत्र्यांच्या अनोख्या फंड्याने शेतकऱ्यांना मिळणार का भरपाई..!

कृषी खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच अब्दुल सत्तार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेत आहेत. दरम्यान, पंचनामे होतात पण प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या. त्यामुळे आता पंचनामे अचून होण्यासाठी पंचनामे करीत असताना तलाठ्यास फोटो काढावा लागणार आहे.

Agricultural : पंचनाम्याचे परफेक्ट नियोजन, कृषी मंत्र्यांच्या अनोख्या फंड्याने शेतकऱ्यांना मिळणार का भरपाई..!
अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 3:33 PM

नागपूर :  (Crop Damage) पीक नुकसानीनंतर पंचनाम्यांचे आदेश, वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी ही सर्व प्रक्रिया जेवढी वेळ घालवणारही आहे तेवढीच परफेक्टही नाही. त्यामुळेच नुकसान होऊन (Compensation) भरपाई मिळालेली नाही अशा तक्रारी ह्या दरवर्षीच्या झाल्या आहेत. शिवाय यामध्ये तथ्यही आहे. दरवर्षी राज्यात किमान लाखो शेतकरी हे मदतीविनाच असतात. यंदा मात्र, ती वेळ येऊ नये आणि पंचनामे योग्य व्हावेत या दृष्टीकोनातून (Agriculture Minister) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तलाठ्यास पिकाबरोबर एक फोटो घेणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे नुकसानीची तीव्रता पंचनाम्यात नियमितता येईल असा त्यांना विश्वास आहे. हे काम आता महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे असून ते कृषी मंत्र्यांच्या सूचनांचे किती पालन करतील यावरही मदतीचे स्वरुप अवलंबून आहे.

काय आहेत कृषीमंत्र्याच्या सूचना?

कृषी खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच अब्दुल सत्तार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेत आहेत. दरम्यान, पंचनामे होतात पण प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या. त्यामुळे आता पंचनामे अचून होण्यासाठी पंचनामे करीत असताना तलाठ्यास फोटो काढावा लागणार आहे. शिवाय किती शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले, किती क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले याची सर्व माहिती तलाठ्यास ग्रामपंचायतीला लावावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आणि भरपाई का मिळाली नाही याचे स्पष्टीकरणही देता येणार आहे.

शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये

पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासर्व शेतकऱ्यांची यादी ही ग्रामपंचायतीमध्ये लावावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकी मदत मिळणार की नाही, किंवा नसेल मिळणार तर च्या मागचे कारण काय? हे सर्व माहित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजीही होणार नाही आणि अधिकाऱ्यांवरही वेगळा असा आरोप होणार नाही. यामध्ये अडचण फक्त एकाच बाबीची आहे की, पंचनामे हे महसूल विभागाकडून होतात आणि हे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे कितपत अंमलबजावणी होणार हे पहावे लागणार आहे.

कृषीमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर

कृषीमंत्री पदाचा स्विकारल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा पहिला दौरा हा विदर्भात होत आहे. शिवाय अधिवेशन आता सोमवारी होत असून त्या दरम्यान पीकांची नेमकी काय स्थिती आहे याची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भातच सर्वाधिक नुकसान झाले असून खरीप हंगामातील पिकांची स्थिती काय याचा आढावा घेऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे पीक पाहणीनंतर सोमवारी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा पडणार याबाबतही सांगण्यात येणार आहे.