Wheat Export: गहू निर्यातीचा श्रीगणेशा..! इजिप्त ठरला पहिला मानकरी, महाराष्ट्राची भूमिका काय?

| Updated on: Apr 18, 2022 | 5:40 AM

जगाला अन्नधान्य पुरवण्याची तयारी दाखविल्यानंतर आता प्रत्यक्ष धान्य निर्यातीला सुरवात झाली आहे. असे असले तरी यंदा भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ठरली आहे ती म्हणजे इजिप्तला पहिल्यांदाच गव्हाची निर्यात झाली आहे. आतापर्यंत इजिप्तला गहू निर्यात करू शकणाऱ्या मान्यताप्राप्त देशांच्या यादीत नव्हता, पण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इजिप्तच्या नियोजन आणि आर्थिक विकास मंत्री डॉ. हॅला एल-सैद यांच्यातील भेटीत हे घडून आले आहे.

Wheat Export: गहू निर्यातीचा श्रीगणेशा..! इजिप्त ठरला पहिला मानकरी, महाराष्ट्राची भूमिका काय?
यंदा रब्बीत गव्हाच्या उत्पादनात घट झाल्याने दरात वा्ढ झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : जगाला अन्नधान्य पुरवण्याची तयारी दाखविल्यानंतर आता प्रत्यक्ष (Grain Export) धान्य निर्यातीला सुरवात झाली आहे. असे असले तरी यंदा (Indian) भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ठरली आहे ती म्हणजे इजिप्तला (Wheat Export) गव्हाची निर्यात झाली आहे. आतापर्यंत इजिप्तला गहू निर्यात करू शकणाऱ्या मान्यताप्राप्त देशांच्या यादीत नव्हता, पण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इजिप्तच्या नियोजन आणि आर्थिक विकास मंत्री डॉ. हॅला एल-सैद यांच्यातील भेटीत हे घडून आले आहे. आतापर्यंत इजिप्तला रशिया आणि युक्रेनमधून गव्हाची निर्यात होत होती पण युध्दाचा परिणाम उत्पादनावर झाला असून ही जागा आता भारताने भरुन काढली आहे. एवढेच नाही तर निर्यातीच्या अनुशंगाने इजिप्तच्या कृषी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील विविध प्रक्रिया उद्योगांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला आहे.

भारत काढणार पोकळी भरुन

रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम थेट येथील शेती उत्पादनावर झाला आहे. इजिप्तला पुरवठा होणाऱ्या गव्हापैकी या दोन देशातून 80 टक्के गहू निर्यात केला जात होता. मात्र, येथील उत्पादनच घटल्यामुळे भारताकडे गव्हाची मागणी वाढू लागली आहे. वाढत्या मागणीचा फायदा यंदा निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. शिवाय अनेक देशांमध्ये बदलत्या वातावरणाचा परिणाम हा उत्पादनावर झाला आहे. तर दुसरीकडे पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात गव्हाचे सरासरी उत्पन्न झाले आहे. त्यामुळे याच राज्यातून अधिकची निर्यात होणार आहे.

काय आहे निर्यातीबाबत भारताचे धोरण?

रशिया-युक्रेन युध्दामुळे धान्याची जागतिक मागणी वाढत आहे. याचा फायदा हा भारत देशाला होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात 1 कोटी गव्हाच्या निर्यातीचे लक्ष्य भारताने समोर ठेवले आहे. गहू उत्पादनात भारत हा सर्वसमावेशक झाला आहे. तर इजिप्तला 30 लाख टन गव्हाची निर्यात करण्याचे उद्दीष्ट असल्याचे कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) अध्यक्ष एम. अंगामुथू यांनी सांगितले आहे. त्यामुळे गहू निर्यातीची मोठी संधी असून वाढलेल्या उत्पादनाचा यंदा देशाला फायदा होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढवण्याच्या दृष्टाने प्रयत्न सुरु आहेत.

या मुख्य देशात होते भारतामधून गव्हाची निर्यात

2019-20 आणि 2020-21 या वर्षांमध्ये 0.2 मेट्रिक टन आणि 2 मेट्रिक टन गव्हाची निर्यात होऊ शकली होती. गेल्या आर्थिक वर्षात एकूण शिपमेंटपैकी सुमारे 50% गहू बांगलादेशला निर्यात करण्यात आला होता. गव्हाच्या निर्यातीतील वाढ ही मुख्यत: बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, कतार, श्रीलंका, ओमान आणि मलेशिया सारख्या देशांच्या मागणीमुळे होते. मात्र, येमेन, अफगाणिस्तान, इंडोनेशियासह अन्य देशांमध्ये गव्हाची निर्यात वाढावी, यासाठी ‘अपेडा’चे प्रयत्न सुरू आहेत. वाणिज्य मंत्रालयाने गव्हाच्या निर्यातीवर व्यापार, शिपिंग आणि रेल्वेसह विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि अपेडाच्या अधिपत्याखाली निर्यातदारांसह एक टास्क फोर्स स्थापन केला आहे.

संबंधित बातम्या :

Sharad Pawar: ‘आळशी माणसांचा भर उसावर’ एका वाक्यात शरद पवारांनी सांगितले अतिरिक्त उसाचे कारण अन् शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही..!

Central Government : कापूस तेजीतच..झुकेगा नहीं..! आयतशुल्क माफीनंतर दरावर परिणाम काय?

Sugarcane Sludge : पावसामुळे वाढला उसाचा गोडवा, साखर उत्पादनात महाराष्ट्रच नंबर वन..!