नवीन कर खरेदी करताय? मग या SUV गाड्यांचा नक्की करा विचार, असा आहे वेटिंग पिरेड

| Updated on: Sep 22, 2022 | 12:56 PM

तुम्ही जर नवीन कर घेण्याच्या विचारात असला तर बाजारात ग्राहकांची पसंती ठरत असलेल्या या गाड्यांचा अवश्य विचार करा. या गाड्यांचा वेटिंग पिरेड देखील जाणून घ्या.

नवीन कर खरेदी करताय? मग या SUV गाड्यांचा नक्की करा विचार, असा आहे वेटिंग पिरेड
Tata Nexon
Follow us on

मुंबई,  येत्या काही दिवसात देशभरात सणांना सुरवात होत आहे. नवरात्र (Navratri 2022), दसरा आणि दिवाळी या महत्त्वाच्या सणांना नवीन वाहन (New Car) खरेदी करणाऱ्याची संख्या मोठी आहे. जर तुम्ही देखील यंदा  सणाच्या मुहूर्तावर  स्वत:साठी उत्तम कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर बाजारात अशा अनेक एसयूव्ही (SUV) आहेत, ज्या तुम्ही आता बुक केल्या तर दिवाळीपर्यंत (Diwali 2022) घरी आणू शकता.

रेनॉल्ट किगर

ही रेनॉल्ट इंडियाची सब-फोर मीटर एसयूव्ही आहे, जर तुम्हाला स्वतःसाठी नवीन कार घ्यायची असेल, तर रेनॉ किगर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठीचा वेटिंग पिरेड 4 ते 6 आठवडे आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे ज्याची सरासरी दरमहा 12,000-15,000 युनिट्स विक्री आहे. ऑगस्ट महिन्यात टाटा मोटर्सने 15,085 गाड्यांची विक्री नोंदवली. मागील वर्षी याच कालावधीशी तुलना केल्यास, 10,006 युनिट्सची विक्री झाली, यामध्ये  51 टक्के वाढ झाली आहे. कंपनी 8-10 आठवड्यांत SUV ची डिलिव्हरी करू शकते.

हे सुद्धा वाचा

निसान मॅग्नाइट

सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये निशान मॅग्नाइट हा एक चांगला पर्याय आहे. फॅमिली कारसाठी ग्राहकाची पसंती येत आहे. या कारचा प्रतीक्षा कालावधी 1-3 महिन्यांचा आहे. तथापि, काही डीलर्स काही दिवसांत ते वितरित करण्याचा दावा करीत आहेत.

मारुती सुझुकी ब्रेझा

भारतीय बाजारपेठेत अलीकडच्या काळात, मारुतीने आपली अद्ययावत ब्रेझा गाडी बाजारात सादर केली आहे. ब्रेझाने ऑगस्ट महिन्यात 15,193 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने 12,906 युनिट्सची विक्री केली होती, ज्यात वार्षिक  18 टक्के वाढ झाली आहे. त्याचा प्रतीक्षा कालावधी 8-10 आठवडे आहे.

ह्युंदाई व्हेन्यू

या कारचा प्रतीक्षा कालावधी प्रामुख्याने तिच्या ट्रिम्स आणि पॉवरट्रेनवर अवलंबून आहे. डिझेल प्रकारांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने यासाठी 4 ते 6 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. तथापि, S, S(O) आणि SX trims मधील पेट्रोल प्रकार 2 महिन्यांच्या आत वितरणासाठी उपलब्ध आहे.