AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चक्क घटस्फोटाची पत्रिका! जयमाला विसर्जनासह होणार अनेक विधी

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पहिल्यांदाच 'घटस्फोट सोहळा' आयोजित केला जात आहे. भाई वेलफेअर सोसायटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत, त्या देखील लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांप्रमाणेच!

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चक्क घटस्फोटाची पत्रिका! जयमाला विसर्जनासह होणार अनेक विधी
घटस्फोट सोहळा Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 13, 2022 | 4:11 PM
Share

आतापर्यंत तुम्ही लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेली पाहिली असेल. पण, आता जे कार्ड व्हायरल होत आहे, ते पाहून प्रत्येकाच्याच भुवया उंचावत आहे . लग्नानंतर घटस्फोटाची निमंत्रण पत्रिका (Divorce Invitation) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. थोडक्यात काय, तर घटस्फोट हा आता दुःखाचा किंवा न्यूनगंडाचा विषय राहिलेला नाही. घटस्फोटासारखी गोष्ट देखील आता साजरी केली जात आहे.  हे घटस्फोट कार्ड सोशल मीडियावर (Viral on social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

घटस्फोट सोहळा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पहिल्यांदाच ‘घटस्फोट सोहळा’ आयोजित केला जात आहे. भाई वेलफेअर सोसायटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत, त्या देखील लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांप्रमाणेच! आता हे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 18 सप्टेंबरला होणारा हा  घटस्फोट सोहळा आता लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. घटस्फोटाचा होणारा हा आनंद आगळावेगळा आहे.

divorce invitation

लोकांना निमंत्रण पत्रिका पाठवून या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जात आहे. गमतीची गोष्ट म्हणजे लग्नादरम्यान ज्या प्रकारचे विधी होतात त्याप्रमाणे विधी  घटस्फोट समारंभातही होणार आहे. जसे-  संगीत, जयमाला विसर्जन, वरातील परत पाठवणे  आणि बरेच काही. एवढेच नाही तर कार्यक्रमाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे, जो कार्डमध्येच छापलेला आहे.

या घटस्फोटाच्या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहितीही देण्यात आली आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेतून गेलेले पुरुष आनंदाने नवीन आयुष्य सुरू करू शकतील आणि त्यांचे जुने आयुष्य विसरून जावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...