ऑटोमॅटीक गाडी विकत घेण्याचा असेल विचार तर हे चार मुद्दे लक्षात ठेवा

| Updated on: Jun 06, 2023 | 4:27 PM

तुम्हालाही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (Automatic Transmission Car)  असलेली कार घ्यायची असेल, तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार असेल तर तुम्हाला गाडी चालवताना गीअर्स बदलण्याची गरज नाही.

ऑटोमॅटीक गाडी विकत घेण्याचा असेल विचार तर हे चार मुद्दे लक्षात ठेवा
ऑटोमॅटीक कार
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : अनेक कार निर्मात्या कंपन्या वेळ आणि मागणी पाहून आपल्या वाहनांमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्य अपडेट करत असतात. ऑटोमॅटिक फीचर हे देखील असेच एक कारचं वैशिष्ट्य आहे. या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हालाही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (Automatic Transmission Car)  असलेली कार घ्यायची असेल, तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार असेल तर तुम्हाला गाडी चालवताना गीअर्स बदलण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारच्या वेगानुसार आणि इंजिनच्या गरजेनुसार गीअर्स आपोआप बदलते. यामुळे इंजिन देखील चांगला प्रतिसाद देते आणि तुम्हाला ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव मिळतो. जर तुम्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार (AMT) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 5 प्रमुख मुद्यांबद्दल नक्की जाणून घ्या.

किंमत

किमतीच्या बाबतीत, एएमटी वाहने नेहमीच मॅन्युअल वाहनांपेक्षा महाग आहेत. तथापि, एमजी वाहनांमध्ये उत्तम ड्रायव्हिंग अनुभव उपलब्ध आहे, कारण ते चालवण्यासाठी तुम्हाला क्लच आणि गियर वारंवार बदलण्याची गरज नाही.

कमी मायलेज

मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार जास्त इंधन वापरतात. कारण मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी स्पीड आणि हाय स्पीड ठरवू शकता. जेव्हा तुम्हाला कार हळू चालवावी लागते, तेव्हा तुम्ही ती कमी गियरमध्ये चालवता, तर हाय स्पीडमध्ये तुम्ही तुमची कार टॉप गियरमध्ये चालवता. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये असे होत नाही.

हे सुद्धा वाचा

ओव्हरटेकिंग मध्ये समस्या

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये ओव्हरटेक करणे खूप अवघड असते. खरं तर मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार गीअर बदलून स्पीड वाढवू शकता, पण ऑटोमॅटिक कारमध्ये असे नाही कारण जेव्हा तुम्ही ओव्हरटेक करण्यासाठी स्पीड वाढवता तेव्हा वेब पकडायला कारला थोडा वेळ लागतो, अशा स्थितीत ऑटोमॅटिक कारने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करणे खूप अवघड होऊन बसते.

डोंगराळ रस्त्यावरून चालवण्यास अडचण

ऑटोमॅटिक कारची सर्वात मोठी अडचण ही आहे की उतार असलेल्या भागात चालवताना अवघड जाते. क्लचला कंट्रोल चालकाकडे नसल्याने चढ उताराच्या भागात गाडी चालवणे कठीण जाते.