वारंवार लागत असेल दृष्ट तर अवश्य करा हे उपाय, वाईट शक्ती राहिल कोसो दुर

मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचे मन-मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मुल रडू लागते.

वारंवार लागत असेल दृष्ट तर अवश्य करा हे उपाय, वाईट शक्ती राहिल कोसो दुर
नकारात्मक उर्जाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 7:31 PM

मुंबई :  अनेकवेळा असे घडते की, करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत, किंवा तुमचे  अभ्यासात मन लागत नाही, घरात कलह आणि वाद निर्माण होतात, घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते. हे सर्व दृष्ट लागल्याने (Negative Energy) देखील होऊ शकते. वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया. प्राचीन काळापासून, लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय

  1. तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून 11 वेळा काढून टाका. त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या.
  2. वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी, थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते 7 वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला काढा, नंतर ते एका ग्लास पाण्यात टाका. त्यानंतर ते फेकून द्या.
  3. जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या 3 बिया घ्या आणि 7 वेळा डोक्यावरून काढा. यानंतर ते जाळून टाका.
  4. कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा, नंतर जाळून टाका.
  5. हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.
  6. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण यांचे जप केल्यानेही वाईट नजर टाळता येते.
  7. वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट घाला.

मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचे मन-मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मुल रडू लागते. दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात. उदा, एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मुल रडू लागते, त्याचे शरीर तापाने फणफणते, चिडचिड करणे इ गोष्टी दिसून येतात. काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

1- तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा. हे तावीज काळ्या दोर्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे.

हे सुद्धा वाचा

2- मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालीसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा. त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. या उपायाने मुलांची भीती दूर होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.