शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये… नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
शिवसेना नेमकी कुणाची, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामधील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत काही जुन्या राजकीय घडामोडींबाबत मोठे दावे केले आहेत.
शिवसेना नेमकी कुणाची, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामधील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत काही जुन्या राजकीय घडामोडींबाबत मोठे दावे केले आहेत.
नरेश म्हस्के म्हणाले, “संजय राऊत फेकूचंद आहे. नरेश म्हस्के त्यांना प्रत्येकवेळी उत्तर देतो. त्यांच्याबद्दल भोंगा वैगेरे अशा शब्दांची निर्मिती केली आहे, त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो.”
यावेळी त्यांनी राज्यसभा तिकीट जाहीर होण्यास झालेल्या विलंबाचाही उल्लेख केला. “अख्ख्या शिवसेनेला माहित आह, ज्यादिवशी त्यांना राज्यसभेच तिकीट लवकर जाहीर होत नव्हतं, तेव्हा उद्धव ठाकरे सोडा, रश्मी वहिनींना किती शिव्या घातल्या होत्या हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. त्यांचं नाव जाहीर करायला उशीर झाला म्हणून ते हे सर्व बोलले” असा दावा म्हस्के यांनी केला.
तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील काही निर्णयांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. पण स्वत:च्या भावाला मंत्रिपद दिलं नाही. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, म्हणून शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये कोणी बैठक घ्यायला लावली? उद्धव ठाकरेंना विरोध करा मुख्यमंत्रीपदासाठी माझं नाव घ्या कोण सांगत होतं? हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे” असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याच्या निर्णयाबाबतही म्हस्के यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संजय राऊत एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हाप्रमुख हा नरेश म्हस्के आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी पाऊल उचललं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा मला फोन आलेला. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे, तुम्हाला भेटायला येणार नाही, इतकंच काय तर हे पण बोललो होतो. शिंदे साहेबांना बोलवा गैरसमज दुर करा.” याशिवाय अयोध्या दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेचा संदर्भ देत म्हस्के यांनी राऊत यांच्याबाबतही दावा केला. ते म्हणाले ठाकरेंना आधीच कल्पना होती. एकनाथ शिंदे जाईल तर नरेश म्हस्केपण सोबतच जाईल आणि म्हणून याला कोणतंच तिकिट देऊ नका, ठाकरेंनची ही भूमिका स्वतः राऊतांनी मला सांगितलं होतं.” त्यांच्या या वक्तव्यांमुळे शिवसेनेतील जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
Published on: Aug 12, 2026 11:55 AM
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...

