AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेक्चर नाही ऐकायचंय, आधी राजीनामा द्या; राहुल गांधींचा शाहांवर हल्लाबोल

राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना जंतरमंतरवरील लाठीचार्ज आणि गोळीबाराचे आदेश कुणी दिले, असा थेट सवाल करत राजीनाम्याची मागणी केली. अमित शाह केवळ 'लेक्चर' देतात, उत्तर देत नाहीत, अशी टीका राहुल गांधींनी केली. आदेश दिले असल्यास दोषी, नसले तरी अकार्यक्षम म्हणून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.

लेक्चर नाही ऐकायचंय, आधी राजीनामा द्या; राहुल गांधींचा शाहांवर हल्लाबोल
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 12:43 PM
Share

आम्हाला अमित शाह यांचं लेक्चर ऐकायचं नाही. ते फक्त लेक्चर देतात. जंतरमंतरवर पॅलेट गनने गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले हे त्यांनी आधी सांगावं? लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते हे त्यांनी सांगावं, असा आव्हान देतानाच जर हे आदेश त्यांनी दिले असतील आणि नसतीलही तरी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत बोलणार आहेत. जंतरमंतरवरील गोळीबारावर ते आपली भूमिका मांडणार आहेत. तसेच झालेल्या आरोपांचंही खंडन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधत आम्हाला शाह यांचं भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नसल्याचं म्हटलं आहे. मी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. आम्हाला अमित शाह यांचे इमेजिनेशन ऐकण्यात स्वारस्य नाही. त्यांचं लेक्चर ऐकायचं नाही. ते फक्त लेक्चर देतात. विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने कुणी गोळ्या घातल्या? कुणी आदेश दिले? कुणी लाठीचार्जच्या ऑर्डर दिल्या? दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाने या सूचना दिल्या आहेत का? असे सवाल राहुल गांधी यांनी केले.

तर ते दोषी आहेत

सिस्टिमने या तरुणांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले की नाही? जर अमित शाह यांनी तसे आदेश दिले असतील तर ते दोषी आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी तसं केलं नसेल तरीही त्यांनी अकार्यक्षम आहेत म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

तुम्हीही घाबरू नका

राहुल गांधी बोलत असताना मीडिया प्रतिनिधींनी मध्येच हस्तक्षेप करत त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी मीडियावरच आगपाखड सुरू केली. मला प्रश्न विचारता. ते बोलतात तेव्हा तुम्ही मध्येच बोलता का? का नाही त्यांना विचारत? आम्हालाच का असं करता? आम्ही बोलत असताना 24 तास हस्तक्षेप करता, मग त्यांच्यात असं काय आहे की संपूर्ण मीडिया त्यांच्यासमोर उंदरासारखा उभा राहतो? असा सवाल करतानाच विद्यार्थी त्यांना घाबरत नाहीये. तुम्हीही घाबरू नये, असं ते म्हणाले.

फुग्यातून हवा निघाली

प्रश्न हा नाही की अमित शाह येऊन काय बोलणार? त्याची आम्हाला पर्वा नाही. 20 दिवसापासून ते गायब होते. संसदेत येत होते आणि जात होते. त्यांचा ताफा असायचा. पण ते बोलत नव्हते. फुग्यातून हवा निघून गेली आहे. शेवटच्या क्षणी ते गॅस भरण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शाह यांच्यात धाडस नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला