AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...

आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका…

| Updated on: Aug 12, 2026 | 12:41 PM
Share

दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात आता महाराष्ट्रात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. भेसळखोरांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात आता महाराष्ट्रात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. भेसळखोरांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व औषध प्रशासनाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला याबाबत कडक कारवाईचे करण्याचे निर्देश दिले आहेत.

विकसीत महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक झाली. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते. विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही नरमाई न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले इतकेच नाही तर संबंधितांवर मकोका लावण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे हा साधा गुन्हा नसून अबालवृद्धांच्या जीवाशी खेळ असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले. बनावट पनीर, भेसळयुक्त दूध आणि इतर पदार्थांमुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भेसळ रोखण्यासाठी नमुने घेणे, प्रयोगशाळेत तपासणी आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईवर भर दिला जाणार आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागाच्या धाडसत्रामुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची काम करण्याची पद्धतही सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

Published on: Aug 12, 2026 12:41 PM

Follow Us