AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!

Sanjay Raut – Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!

| Updated on: Aug 12, 2026 | 10:20 AM
Share

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातील एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनावणीनंतर दोन्ही गटांचे नेते सुप्रीम कोर्टाबाहेर आले असताना राऊत आणि म्हस्के यांच्यात हलकाफुलका संवाद पाहायला मिळाला.

नरेश म्हस्के यांना पाहताच संजय राऊत यांनी त्यांच्याकडे पाहून “यावंच लागणार” अशी मिश्कील टिप्पणी केली. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर परिसरात एकच हशा पिकला. त्यानंतर राऊत यांनी म्हस्के यांना माध्यमांसमोर येण्यासाठी बोलावले.

मात्र, नरेश म्हस्के यांनी हातवारे करत आधी तुम्ही माध्यमांना बाईट द्या, असा इशारा केला. त्यानंतर संजय राऊत यांनी म्हस्के यांच्याकडे बोट दाखवत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना त्यांना सोबत घेऊन येण्यास सांगितले.

दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर नरेश म्हस्के, संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे एकत्र दिसले. यावेळी चौघांनीही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले आणि त्यानंतर तेथून निघून गेले.

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकारावर दोन्ही गटांकडून जोरदार कायदेशीर युक्तिवाद सुरू असताना न्यायालयाबाहेर मात्र नेत्यांमध्ये दिसलेला हा हलकाफुलका प्रसंग चर्चेचा विषय ठरला.

Published on: Aug 12, 2026 10:20 AM

Follow Us