कशी असेल नवी 7 सीटर Kia Sonet, ‘या’ जबरदस्त फीचर्ससह कार लाँच होणार

| Updated on: Apr 12, 2021 | 7:02 AM

किआ सोनेटची (Kia Sonet) थ्री रो सीटिंग कॉन्फिगरेशनवाली कार सादर करण्यात आली आहे. नुकतीच इंडोनेशियन बाजारात ही कार पाहायला मिळाली.

कशी असेल नवी 7 सीटर Kia Sonet, या जबरदस्त फीचर्ससह कार लाँच होणार
Follow us on

मुंबई : किआ सोनेटची (Kia Sonet) थ्री रो सीटिंग कॉन्फिगरेशनवाली कार सादर करण्यात आली आहे. नुकतीच इंडोनेशियन बाजारात ही कार पाहायला मिळाली. या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार (7 सीटर कार) अगदी 5 सीटर मॉडेलप्रमाणेच दिसते. परंतु सॉनेट 4120 मिमी मोठी, 125 मिमी लांब आहे. तर भारतीय मॉडेलच्या सॉनेटचे मेजरमेंट 3995 मिमी इतकं आहे. म्हणजेच इंडोनेशियन व्हेरियंट हे भारतीय व्हेरिएंटपेक्षा थोडं मोठं असून कंपनीनेही याचा फायदा घेत यामध्ये रो ऑफ सीट्स जोडल्या आहेत. (Kia Sonet to be launched with seven seater Variants)

किआने या कारमध्ये तिसऱ्या रो ऑफ सीट्स बूटमध्ये जोडल्या आहेत. या सीट्स खूप सहजपणे दुमडल्या जाऊ शकतात ज्यामुळे आपल्याला अधिक बूट स्पेस मिळेल. किआने येथे टू रो सीट्ससाठी स्प्लिट फोल्डिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या कारमधील इतर काही बदलांविषयी बोलायचे झाल्यास या सीट्स मागे व पुढेदेखील सरकवल्या जाऊ शकतात जेणेकरून लेगरूम स्पेस मिळेल.

फीचर्स

या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये रूफ माउंटेड एसी वेंट्स दिले आहेत, जे ब्लोअर कंट्रोल्ससह येतात. त्याच्या मदतीने मागील प्रवासी एसीचा आनंद घेऊ शकतील. इतर फीचर्स 5 सीटर सोनेटसारखेच आहेत. म्हणजेच 8.0 इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टम, अँड्रॉयड ऑटो, अॅपल कार प्ले, वायरलेस फोन चार्ज, हवेशीर फ्रंट सीट आणि इलेक्ट्रिक सनरुफ उपलब्ध आहेत.

अंडर द हुड या कारमध्ये 1.5 लीटरचे चार सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे 115hp पॉवर आणि 144nm टॉर्क देतं. गिअरबॉक्स पर्यायामध्ये यात 6 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन पर्याय आहे.

भारतात कधी लाँच होणार?

भारतीय ग्राहकांना या कारसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागू शकते. तसेच इंडोनेशियन बाजारात दाखल झालेल्या सोनेटपेक्षा भारतीय बाजारातील सोनेट कार थोडी लहान असू शकते. कारण या कारमध्ये थर्ड रो जोडल्यास कंपनीला कारची लांबी वाढवावी लागेल. त्यामुळे या कारवरील टॅक्समध्ये कंपनीला जो फायदा मिळतोय, तो होणार नाही. त्याच वेळी जर सोनेट मोठ्या व्हर्जनमध्ये लाँच केली तर या कारची किंमत वाढवावी लागेल.

इतर बातम्या

बंपर ऑफर! Maruti Suzuki Swift वर कंपनीकडून 54000 रुपयांचा डिस्काऊंट

बंपर ऑफर! Maruti Suzuki Swift वर कंपनीकडून 54000 रुपयांचा डिस्काऊंट

(Kia Sonet to be launched with seven seater Variants)