Electric Bike : 25 पैशांत धावणार 1KM! पुढच्या आठवड्यात येतेय ग्राहकांच्या फायद्याची इलेक्ट्रिक बाइक

| Updated on: Apr 26, 2024 | 12:57 PM

Upcoming Electric Bike : पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत Okaya Disruptor लॉन्च होणार आहे. या इलेक्ट्रिक बाइकच्या भारतात लॉन्चिगआधी काही खास फिचर्सबद्दल माहिती मिळालीय. कंपनीने ग्राहकांसाठी बुकिंग सुद्धा सुरु केलय.

Electric Bike : 25 पैशांत धावणार 1KM! पुढच्या आठवड्यात येतेय ग्राहकांच्या फायद्याची इलेक्ट्रिक बाइक
okaya disruptor
Image Credit source: okaya
Follow us on

Electric Vehicles ची मार्केटमध्ये मागणी वेगाने वाढतेय. त्यामुळेच ऑटो कंपन्या ग्राहकांची गरज ओळखून फुली-पॅक्ड फीचर्ससह नवीन मॉडल्स लॉन्च करत आहेत. Okaya EV पुढच्या आठवड्यात 2 मे 2024 रोजी आपला प्रीमियम ब्रँड Ferrato अंतर्गत भारतीय बाजारात एक नवीन Electric Bike लॉन्च करणार आहे. कंपनीने लॉन्च आधी Electric Motorcycle चा टॉप-स्पीड आणि टॉर्क या सारखे खास फीचर्स कंफर्म केले आहेत.

ग्राहकांसाठी Okaya Disruptor ची बुकिंग सुरु झाली आहे. या बाइकला कंपनीचे ऑफलाइन स्टोर्स किंवा कंपनीच्या ऑफिशियल साइटच्या माध्यमातून घरबसल्या बुक केलं जाऊ शकतं. ही बाइक बुक करण्यासाठी तुम्हाला किती रुपये बुकिंग अमाऊंट द्यावी लागेल?

बुकिंग अमाऊंट किती?

कंपनी एक मोठी बुकिंग ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने सुरुवातीच्या 1000 ग्राहकांसाठी केवळ 500 रुपये देऊन इलेक्ट्रिक बाइक बुक करण्याची सुविधा देत आहे. 1000 ग्राहकांनंतर या बाइकला बुक करण्यासाठी 2500 रुपये बुकिंग अमाऊंट द्यावी लागेल.

Okaya Disruptor Range: फुल चार्जमध्ये ही बाइक किती पळणार?

रिपोर्ट्सनुसार, या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 3.97 kWh LFP बॅटरी देता येईल. ड्रायविंग रेंजबद्दल बोलायच झाल्यास फुल चार्जमध्ये ही बाइक 129 किलोमीटर पर्यंत पळू शकते. आणखी एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे ही बाइक चालवण्याचा खर्च खूप कमी आहे. प्रति किलोमीटरवर फक्त 25 पैसे खर्च येईल. टॉप स्पीडबद्दल बोलायच झाल्यास कंपनीच्या ऑफिशियल साइटनुसार, या बाइकचा टॉप स्पीड 95 kmph आहे.

या इलेक्ट्रिक बाइकच्या फ्रंटमध्ये सस्पेंशनची जबाबदारी टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि रियरमध्ये मोनो-शॉक यूनिटवर आहे. त्याशिवाय दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचा फायदा मिळेल.

इलेक्ट्रिक बाइकची किंमत किती?

ओकायाच्या या स्टायलिश लुकवाल्या इलेक्ट्रिक बाइकची किंमत लवकरच समोर येईल. कंपनी 2 मे रोजी लॉन्च इवेंट दरम्यान किंमत जाहीर करेल.