सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; केंद्र सरकारकडून GPF च्या नव्या दरांची घोषणा

| Updated on: Jul 07, 2021 | 12:27 PM

GPF Provident Fund | GPF हा प्रोव्हिडंट फंड खासप्रकारच्या कर्मचाऱ्यांनाच लागू होतो. निवृत्तीवेळी याचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनातील काही पैसे GPF खात्यामध्ये टाकावे लागतात.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; केंद्र सरकारकडून GPF च्या नव्या दरांची घोषणा
7th pay commission
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नुकतेच सप्टेंबर तिमाहीसाठी जनरल प्रोव्हिडंट फंडाच्या (GPF) नव्या व्याजदरांची घोषणा केली. त्यानुसार आता खातेधारकांना 7.1 टक्के इतके व्याज मिळेल. जनरल प्रोव्हिडंट फंडावरही PPF आणि PF प्रमाणे फायदा मिळतो. मात्र, केंद्र सरकारने गेल्या सहा तिमाहींपासून GPF च्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारने हा व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता. (Big News for government employees new intrest rates of gpf announced)

GPF हा प्रोव्हिडंट फंड खासप्रकारच्या कर्मचाऱ्यांनाच लागू होतो. निवृत्तीवेळी याचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनातील काही पैसे GPF खात्यामध्ये टाकावे लागतात. तर काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी GPF बंधनकारक आहे.
या खात्यात साठवलेले पैसे निवृत्तीनंतर संबंधित कर्मचाऱ्याला दिले जातात. संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर हे पैसे त्याच्या वारसदाराला मिळतात. GPF खात्यावर घेतलेल्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.

GPF व्याजदर कोणत्या योजनांसाठी लागू होणार?

1. जनरल प्रोव्हिडंट फंड (सेंट्रल सर्विसेज)
2. कॉन्ट्रिब्यूटरी प्रोव्हिडंट फंड
3. ऑल इंडिया सर्विसेज प्रोव्हिडंट फंड
4. स्टेट रेलवे प्रोव्हिडंट फंड
5. इंडिया नेवल डॉकयार्ड वर्कमॅन प्रोव्हिडंट फंड
6. डिफेंस सर्विसेज ऑफिसर्स प्रोव्हिडंट फंड
7. द आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रोव्हिडंट फंड
8. जनरल प्रोव्हिडंट फंड (डिफेन्स सर्विस)
9. इंडियन ऑर्डनेंस डिपार्टमेंट प्रोव्हिडंट फंड
10. इंडिया ऑर्डनेंस फॅक्टरीज वर्कमॅन प्रोव्हिडंट फंड

संबंधित बातम्या:

PPF नव्हे तर ‘हा’ आहे पैसे वेगाने दुप्पट करण्याचा सोप्पा मार्ग

‘आधार’वरुन अवघ्या तीन दिवसात पीएफ काढणं शक्य!

करोडपती व्हायचंय, मुच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक करुन 20 वर्षांनंतर मिळवा परतावा

(Big News for government employees new intrest rates of gpf announced)