युद्धादरम्यान ग्राहकांना दिलासा; देशी खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, पाम तेलाच्या दरात तेजी कायम

| Updated on: Mar 04, 2022 | 7:12 AM

गुरुवारी खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात घसरल्याचे पहायला मिळाले. सोयाबीन (Soybean) आणि शेंगदाना तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभर तेल मार्केटमध्ये चढ -उतार पहायला मिळत होता.

युद्धादरम्यान ग्राहकांना दिलासा; देशी खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, पाम तेलाच्या दरात तेजी कायम
खाद्यतेल
Follow us on

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाचे (Crude oil) दर 120 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या दरांसोबतच खाद्य तेलाचे (edible oil) दर देखील वाढल्याचे पहायला मिळत आहे. मात्र गुरुवारी खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात घसरल्याचे पहायला मिळाले. सोयाबीन (Soybean) आणि शेंगदाना तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभर तेल मार्केटमध्ये चढ -उतार पहायला मिळत होता. शेवटी थोड्याश्या घसरणीसह मार्केट बंद झाले. मागणी कमी आणि उत्पादन जास्त झाल्याने तेलाचे दर थोडेसे कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पाम तेलाच्या दरात तेजी

मिळत असलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच शेंगदाना तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. गुजरातमध्ये शेंगदाना तेल तब्बल लिटर मागे नऊ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर इतर तेलांच्या किमतीमध्ये देखील घसरण झाली. मात्र दुसरीकडे पाम तेलाच्या भावात अद्यापही तेजी कायम आहे. देशात बाहेरून आयात केलेल्या पाम तेलाच्या दरात तेजी पहायला मिळत आहे. तर देशात उत्पादीत होणाऱ्या इतर तेलाचे भाव घसरले आहेत. युद्धामुळे पुरवठा साखळी खंडित झाल्याने पाम तेलाचे दर वधारल्याचे पहायला मिळत आहे.

भविष्यात तेलाच्या आयातीवर परिणाम होणार?

तेलाच्या एकूण गरजेपैकी भारत सुमारे 65 टक्के तेल आयात करतो. यापैकी आपल्याला सुर्यफूलाच्या तेलाचा सर्वाधिक म्हणजे जवळपास सत्तर टक्के पुरवठा युक्रेनमधून होतो. तर 20 टक्के तेलाचा पुरवठा हा रशियामधून होतो. दहा टक्के तेल आपण अर्जेंटिनाकडून आयात करतो. सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असून, त्यामुळे तेलाच्या आयातीवर परिणाम होत आहे. आयात कमी होऊन, तेलाची मागणी वाढल्यास येणाऱ्या काळात तेलाचे दर गगनाला भिडू शकतात.

संबंधित बातम्या

तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा

रशिया-युक्रेन युद्धात SBI चे अडकले कोटी रुपये, कशी केली जाईल रिकव्हरी?

वर्षभरात ‘या’ स्टॉकने केले 1 लाखांचे 18 लाख…गुंतवणूकदार झाले मालामाल…