रशिया-युक्रेन युद्धात SBI चे अडकले कोटी रुपये, कशी केली जाईल रिकव्हरी?

यूक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशिया जगभरात निशाण्यावर आहे. अमेरीका, कॅनडा,ब्रिटन जर्मनी सारख्या देशांनी रशियावर अनेक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधा मध्ये रशियाला स्विफ्ट मधून बाहेर करण्याचा निर्णय सर्वात परिणामकारक मानला जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धात SBI चे अडकले कोटी रुपये, कशी केली जाईल रिकव्हरी?
Russia Ukraine warImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 10:34 PM

मुंबईः हल्ली रशिया युक्रेन यांच्या युद्धातसंदर्भातील बातम्या बद्दल जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक पातळीवर सुद्धा होत आहे परंतु अनेक देश या युद्धामुळे आर्थिक संकटाला सामोरे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.ही शक्यता मात्र भारताच्या बाबतीत खरी ठरत आहे.यूक्रेन (Ukraine) वर हल्ला केल्यानंतर रशियाला ग्लोबल पेमेंट सिस्टम स्विफ्ट (SWIFT) मधून एकटं पाडण्यात आले आहे. ज्या बँकांचे रशियात काही गुंतवणूक आहे, अश्या अनेक फायनेंशियल इंस्टीट्यूशंस किंवा कंपन्या यांना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.भारतीय बँकाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सरकारी क्षेत्रातील एसबीआय (SBI) वर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. एका रिपोर्ट नुसार ,रशिया मध्ये एसबीआयची गुंतवणूक 10 मिलियन डॉलर म्हणजेच 75 कोटी रुपये इतकी आहे. सीनियर बँकर्स यांचे म्हणणे असे आहे, की ,यातून ही अधिकतर वसुली म्हणजे रिकव्हरी होण्याची शक्यता आहे.

सगळ्या बँकांकडून फीडबॅक घेत आहे आरबीआय

हाती आलेले बातम्या नुसार , एसबीआयचे एक्सपोजर ट्रांजेक्शन (Transaction) संबधित आहे. रशिया कंपनी सोबतच ट्रांजेक्शन करण्याबाबत निर्बंध लावले असल्यामुळे आता आरबीआय अडकेले पैसे कसे परत मिळवायचे या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर शोधण्यात व्यस्त आहे. सेंट्रल बँक सर्व बँकांकडून जो पैसा अडकलेला आहे त्याचे नेमके स्वरूप काय आहे याबद्दलची माहिती जमा करत आहे. एकदा या सर्व बँकांकडून व्यवस्थीत फीडबॅक मिळाल्यास आर बीआय या संबधित एक्शन प्लॅन जाहीर करू शकतो.

बंदी केल्यानंतर 10 दिवसाचा मिळतो अवधी

बँकर्सचे म्हणणे आहे की, बंदी लावल्यानंतर संबंधित बँका आणि वित्तीय संस्थांना आपले स्विफ्ट ऑपरेशन बंद करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी मिळतो. सर्वसाधारणपणे बंदी लागण्याच्या स्थितीमध्ये असतात तेव्हा आधी जे काही ट्रांजेक्शन प्रोसेस केलेले असतात ते पूर्ण केले जातात. निर्बंध लावल्यानंतर कोणतेही नवीन ट्रांजेक्शन करू शकत नाही. इराणवर निर्बंध लावले गेले होते तेव्हा अश्या प्रकारची सुट देण्यात होती म्हणून या कारणामुळे आशा व्यक्त केली जात आहे की एसबीआय बँकेला सुद्धा 10 दिवसांचा वेळ मिळेल जेणेकरून जे काही ट्रांजेक्शन झालेले आहेत त्याबद्दल च्या प्रक्रिया पार पडून पैसे रीकव्हर होऊ शकतील.

सरकार या पर्यायचा करू शकते वापर

काही बातम्यांमध्ये असे सुद्धा सांगण्यात येत आहे की, सरकार आणि आरबीआय एखादा पर्यायाच्या शोधात आहे. ट्रेड आणि बिझनेससाठी पेमेंट कोणत्याही अडथळ्याशिवाय करता यावा यासाठीचे प्रयत्न देखील केले जात आहे. ज्या पर्यायांबद्दल विचार केला जात आहे ,त्यामध्ये रुपया-रूबल अरेंजमेंट (Rupee-Rouble Arrangment) चा समावेश आहे.तसे पाहायला गेले तर यामध्ये जोखीम सुद्धा आहे. गेल्या आठवड्यापासून रूबलच्या दरात मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

संबंधित बातम्या

वर्षभरात ‘या’ स्टॉकने केले 1 लाखांचे 18 लाख…गुंतवणूकदार झाले मालामाल…

LIC IPO: रशिया युक्रेन वादामुळे एलआयसी आयपीओ पुढे ढकलला? पुढील आर्थिक वर्षापर्यंत निर्णय लांबणीवर…

रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांची वाढ

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.