AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Womens Day : 8 मार्चलाच का साजरा करतात महिला दिन ? इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व जाणून घ्या

International Womens Day: तुम्हाला माहिती आहे का की, 8 मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? याविषयीची माहिती जाणून घेऊया.

International Womens Day : 8 मार्चलाच का साजरा करतात महिला दिन ? इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व जाणून घ्या
महिला दिनImage Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Mar 08, 2026 | 6:00 AM
Share

International Womens Day: जागतिक महिला दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून तो महिलांच्या प्रदीर्घ संघर्षाचा, त्यांच्या हक्कांच्या लढ्याचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. पण या तारखेमागे एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

‘8 मार्च’ या तारखेचा इतिहास

8 मार्च ही तारीख निश्चित होण्यामागे प्रामुख्याने रशियातील महिलांचे आंदोलन कारणीभूत आहे.

न्यू यॉर्कमधील लढा (1908):  महिलांच्या संघर्षाची ठिणगी 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये पडली. सुमारे 15,000 महिलांनी कामाचे तास कमी करणे, चांगले वेतन आणि मतदानाचा अधिकार या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.

आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचा प्रस्ताव (1910):  जर्मनीच्या समाजवाद्या क्लारा झेटकिन यांनी कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला, जो मान्य झाला.

रशियन क्रांती आणि 8 मार्च (1917):  पहिल्या महायुद्धाच्या काळात रशियातील महिलांनी 23 फेब्रुवारी 1917 रोजी (जुलियन कॅलेंडरनुसार) ‘ब्रेड अँड पीस’ (अन्न आणि शांतता) या मागणीसाठी ऐतिहासिक संप पुकारला. त्याकाळी रशियात वापरल्या जाणाऱ्या जुलियन कॅलेंडरमधील 23 फेब्रुवारी म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार (जे आपण आज वापरतो) 8 मार्च ही तारीख होती.

अधिकृत मान्यता: रशियातील या आंदोलनानंतर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) 8 मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून अधिकृत मान्यता दिली.

महिला दिनाचे महत्त्व

हा दिवस महिलांना समाजात समान दर्जा मिळावा आणि त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर व्हावेत यासाठी समर्पित आहे.

कर्तृत्वाचा सन्मान: विज्ञान, कला, क्रीडा, राजकारण आणि समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत महिलांनी मारलेली भरारी साजरी केली जाते.

समानतेसाठी जागरुकता: वेतन समानता, शिक्षणाच्या संधी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करून जनजागृती केली जाते.

महिला सक्षमीकरण: महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबवले जातात.

आज जरी महिला सर्व क्षेत्रांत आघाडीवर असल्या, तरी आजही लिंगभेद आणि अत्याचारासारखी आव्हाने पूर्णपणे संपलेली नाहीत. त्यामुळे 8 मार्च हा दिवस केवळ उत्सव म्हणून न पाहता, महिलांच्या अधिकारांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!