AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवा भाऊ टॅक्सी सेवा सुरू होणार… 3 हजार तरुणांना परवाना मिळणार, काय आहे योजना?

Deva Bhau Taxi Service : मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात लवकरच देवा भाऊ टॅक्सी सेवा सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात 2 ते 5 हजार वाहने रस्त्यावर उतरतील. या योजनेअंतर्गत 3 हजार तरुणांना टॅक्सी व परमिट देण्यात येणार असून हजारो रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

देवा भाऊ टॅक्सी सेवा सुरू होणार... 3 हजार तरुणांना परवाना मिळणार, काय आहे योजना?
Deva Bhau TaxiImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 16, 2026 | 6:32 PM
Share

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच देवा भाऊ टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या खासगी कॅब सेवांसारखी ही सेवा असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परवडणाऱ्या दरात या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कमी पैशात प्रवास करता येणार आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून देवाभाऊ टँक्सी सेवा आणली जाणार आहे. या टॅक्सी सेवेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

देवाभाऊ सहकारी टँक्सी आणि छावा टँक्सी सेवा

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या योजनेची माहिती देताना म्हटले की, ‘भारत टँक्सीच्या धर्तीवर मुंबई आणि एमएमआर रिजीझनमध्ये देवाभाऊ सेवा सहकारी टँक्सी आणि छावा टँक्सी सेवा आणली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन याला हिरवा कंदील दिला आहे. प्रताप सरनाईकांनी यासंदर्भातील धोरण निश्चित केलेलं आहे. MMR रिजीनमध्ये ही टँक्सीसेवा असणार आहे. यामुळे ड्रायव्हर आणि टँक्सी चालकाला रोजगार मिळणार आहे. तसेच चांगली सेवा मुंबईकरांना मिळणार आहे. पहिल्या फेरीत 2 ते 5 हजार वाहने एमएमआर रिजीनमध्ये उपब्लध होणार आहे.’

या टॅक्सी सेवेबाबत आमदार प्रसाद लाड यांनीही भाष्य केले आहे. आमदार लाड म्हणाले की, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात, मुंबै बँकेच्या वतीने किमान 3 हजार तरूणांना टॅक्सी दिली जाणार आहे. यासाठी अडाणी विमानतळ आणि इतर काही संस्था आणि हॉटेल्सशी आमची चर्चा झालेली आहे. ज्या 3000 तरुणांना टॅक्सी देणार त्यांना परमिटही दिलं जाईल. हे परमिट देवा भाऊ टॅक्सी सर्व्हिसच्या नावाने असणार आहे. 3000 तरुणांना आम्ही टॅक्सी दिली तर त्यामुळे 6 ते 9 हजार मुलांना रोजगार मिळू शकतो.

दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवा प्रयोग

याआधी दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये सरकारच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आलेल्या अशा सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेत स्वस्तात प्रवास करता येणार असल्याने आता मुंबईतही ही सेवा लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. आता ही सेवा कधी सुरू होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी