बाप आणि मुलासोबत चित्रपटांमध्ये रोमान्स करणारी अभिनेत्री, 59 व्या वर्षी देखील दिसते प्रचंड सुंदर
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री जिने बाप आणि मुलासोबत चित्रपटांमध्ये केला आहे रोमान्स. सौंदर्य असं की 59 व्या वर्षी देखील टॉपच्या अभिनेत्रींना देते टक्कर. कोण आहे ती?

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या पडद्यामागील गोष्टी चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. ‘मदर इंडिया’मध्ये अभिनेत्री नरगिस यांनी सुनील दत्त यांच्या आईची भूमिका साकारली होती आणि पुढे याच दोघांनी लग्न केले. असाच एक रंजक किस्सा अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बाबतीतही पाहायला मिळतो. माधुरीने वेगवेगळ्या काळात अभिनेता विनोद खन्ना आणि त्यांचा मुलगा अक्षय खन्ना या दोघांसोबतही पडद्यावर काम केले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही चित्रपटांमध्ये तिची भूमिका वेगवेगळी होती.
विनोद खन्नांसोबत साकारली पत्नीची भूमिका
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ या चित्रपटात विनोद खन्ना यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दोघांची जोडी चर्चेत आली होती.
नऊ वर्षांनंतर अक्षय खन्नासोबत रोमान्स
‘दयावान’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तब्बल नऊ वर्षांनी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा खन्ना कुटुंबातील अभिनेत्यासोबत पडद्यावर झळकली. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बत’ या चित्रपटात तिने विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना याच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि अक्षय खन्ना यांच्यात प्रेमाचे प्रसंग दाखवण्यात आले होते.
अशा प्रकारे माधुरी दीक्षितने आधी विनोद खन्ना आणि नंतर त्यांचा मुलगा अक्षय खन्ना यांच्यासोबत चित्रपटात काम केले. बॉलिवूडमधील ही एक दुर्मिळ आणि रंजक बाब मानली जाते. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनीही अशाच प्रकारे अभिनेता बाप आणि मुलासोबत पडद्यावर काम केले आहे.
सध्या मराठी टीव्हीवर माधुरीची लोकप्रियता
सध्या माधुरी दीक्षित छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ती अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या मराठी आवृत्तीचे म्हणजेच ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करत आहे.
याशिवाय, याच वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मां बहन’ या डार्क-कॉमेडी थ्रिलर चित्रपटातही ती अभिनेत्री म्हणून दिसली होती. चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकीर्द आणि विविध भूमिका यांमुळे माधुरी दीक्षित आजही चाहत्यांच्या पसंतीची अभिनेत्री आहे. आजही तिची गाणी आणि चित्रपट प्रेक्षक आवडीने बघताना दिसतात.
