AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soni Razdan : फटाके फोडणं म्हणजे देशद्रोह, दिया मिर्झा प्रकरणाच्या पार्शवभूमीवर आलिया भट्टच्या आईचं वक्तव्य; म्हणाली…

Soni Razdan Post : आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी दिवाळीत फटाके फोडण्यावर आणि प्रदूषणावर पोस्ट शेअर केली आहे.

Soni Razdan : फटाके फोडणं म्हणजे देशद्रोह, दिया मिर्झा प्रकरणाच्या पार्शवभूमीवर आलिया भट्टच्या आईचं वक्तव्य; म्हणाली...
| Updated on: Nov 04, 2026 | 8:11 PM
Share

दिवाळीच्या पार्शवभूमीवर देशभरातील लहान-मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे. पंजाबमधील बठिंडा येथे ११०० हून अधिक, तर हरियाणातील हिसार येथे 800 चा AQI नोंदवला गेला. बुधवारी दिल्लीचा AQI 432 च्या वर गेला. दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी लोकांना दिवाळी व्यतिरिक्त इतर दिवशी फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी, दिया मिर्झाच्या अशाच एका पोस्टमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. राजकीय वातावरण तापल्यानं, बीएमसीने सुरुवातीला तो व्हिडिओ काढून टाकला, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या ताकीदीनंतर तो पुन्हा पोस्ट केला. आता, आलिया भट्टची आई, अभिनेत्री सोनिया राजदान यांनी फटाक्यांबद्दल एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. अभिनेत्रीनं लोकांना ‘हरित दिवाळी’ साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी फटाके जाळणं हे ‘राष्ट्रविरोधी’ कृत्य असल्याचंही स्पष्टपणे सांगितलंय.

सोनी राजदान यांची पोस्ट

आलीया भट्टची आई अभिनेत्री सोनिया राजदान यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी दिवाळीत फटाके जाळणं किती धोकादायक असू शकतं यावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी लिहिलं की, ‘लहान मुलांचे पालक तुम्हाला सांगू शकतात की, वायू प्रदूषणामुळे त्यांच्या मुलांना किती त्रास होत आहे. आजारपणामुळे त्यांना किती दिवस शाळा चुकवावी लागते. फटाके फोडणं हे जीवन आणि आरोग्याच्या विरोधात आहे, ते देशविरोधी आहे.’

‘त्यामुळे जर तुम्ही मला विचाराल की, या परिस्थितीत या दिवाळीत एक जरी फटाका जाळणं योग्य आहे का, तर मी म्हणेन की ते आयुष्याच्या विरोधात आहे, आरोग्याच्या विरोधात आहे आणि हो… ते देशविरोधी सुद्धा आहे. आरोग्य ही एक निवड आहे जी आपण स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी करतो. चला योग्य निवड करूया.’ असं अभिनेत्रीनं शेवटी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

दरम्यान, दिया मिर्झाच्या अलीकडील वादातून सोनिया राजदान यांनी कोणतीही कठोर प्रतिक्रिया टाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, त्यानी पोस्टवरील कमेंट्स सेक्शन बंद केलं आहे. मुंबई महानगरपालिकेनं (बीएमसी) दिया मिर्झाचा जनजागृतीपर व्हिडिओ हटवल्यानंतर काही दिवसांनीच सोनी यांची ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, जनजागृती करण्यासाठी बीएमसीनं अनेक सेलिब्रिटींना व्हिडिओ तयार करून शेअर करण्यास सांगितलेलं. दिया मिर्झानेही लोकांना प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. अभिनेत्रीनं फटाके न फोडण्याचं आवाहनही केलं होते. मात्र, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि इतर नेत्यांनी दिया मिर्झाच्या आवाहनाला तात्काळ विरोध केला. दिवाळी कशी साजरी करावी हे हिंदूंना शिकवण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. इतर सणांच्या वेळी ती अशीच आवाहनं का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वाढत्या राजकीय विरोधानंतर, बीएमसीनं दिया मिर्झाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काढून टाकला.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा