AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!

ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच…ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!

| Updated on: Jun 16, 2026 | 6:34 PM
Share

सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेलं प्रकरण म्हणजे 'ऑपरेशन टायगर'. शिवसेना (उबाठा) पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेलं प्रकरण म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. शिवसेना (उबाठा) पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. रविवारी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी “ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा” अशी प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे. या भेटीनंतर ठाकरेंच्या गटातील काही नेते शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, ठाकरेंच्या गटातील जवळपास 4 ते 5 नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मंत्रिपदाच्या आमिषामुळे हे नेते शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Published on: Jun 16, 2026 06:34 PM

Follow Us