Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
राज्यातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत महिला बचत गटांना एक हेक्टर जमीन लीज तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत महिला बचत गटांना एक हेक्टर जमीन लीज तत्त्वावर (भाडे तत्वावर) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला बचत गटांना ही जमीन पाच वर्षांच्या कालावधीसाठी वापरण्यास दिली जाणार आहे. या माध्यमातून महिलांना विविध उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि उत्पन्नवाढीच्या उपक्रमांना चालना मिळणार आहे.
याशिवाय महिला बचत गटांना आर्थिक बळकटी देण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे आणि ग्रामीण तसेच शहरी भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिला बचत गटांना व्यवसाय विस्ताराची संधी मिळणार असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती आणि पात्रतेचे निकष लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Published on: Jun 16, 2026 05:19 PM
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना

