सेवानिवृत्तीपर्यंत 23 कोटी मिळवण्यासाठी दरमहा किती गुंतवणूक करावी?, जाणून घ्या

| Updated on: Aug 24, 2021 | 7:55 AM

बहुतेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या मासिक एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात, परंतु ते योग्यरीत्या करू शकत नाहीत. यामुळे एसआयपीद्वारे गुंतवणूकदारांचे उत्पन्न वाढत नाही.

सेवानिवृत्तीपर्यंत 23 कोटी मिळवण्यासाठी दरमहा किती गुंतवणूक करावी?, जाणून घ्या
बँक किंवा वित्तीय सेवा (Bank Selection) : तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही कालावधीसाठी FD करु शकता, परंतु केवळ व्याज दराच्या लालसेपोटी, कोणत्याही संस्थेत FD करू नये. बँक किंवा वित्तीय संस्थेचे रेटिंग आणि गुडविल पाहणे चांगले होईल.
Follow us on

नवी दिल्लीः बदलत्या काळात सेवानिवृत्तीच्या वेळी एक चांगला निधी खूप महत्त्वाचा झालाय. बहुतेक सरकारी नोकऱ्यांमध्येही आता पेन्शन जवळपास संपुष्टात आलीय. परंतु जर तुम्ही योग्य मार्गाने गुंतवणूक केली तर तुमची निवृत्ती अधिक चांगली होऊ शकते. जर दीर्घकालीन गुंतवणूक हुशारीने आणि योग्य मार्गाने केली गेली, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 23 कोटी रुपयांचा निधी खूप सहजपणे तयार होऊ शकतो. परंतु यासाठी योग्य वेळी गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे. बहुतेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या मासिक एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात, परंतु ते योग्यरीत्या करू शकत नाहीत. यामुळे एसआयपीद्वारे गुंतवणूकदारांचे उत्पन्न वाढत नाही.

वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करणे योग्य

कर तज्ज्ञांच्या मते, जर एखादा गुंतवणूकदार वयाच्या 25 व्या वर्षी एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतोय आणि निवृत्तीपर्यंत गुंतवणूक करतो, तर तो संपूर्ण 35 वर्षे सतत गुंतवणूक करतोय. यामुळे गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी मोठा निधी तयार होतो.

गुंतवणुकीवर 12 ते 16 टक्के परतावा शक्य

दुसर्‍या कर तज्ज्ञाच्या मते, जर तुम्ही 35 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणुकीवर 12 ते 16 टक्के परतावा मिळतो. गुंतवणूकदाराने गुंतवणुकीदरम्यान आणि नंतर महागाई लक्षात घेऊन 20 कोटींचा निधी तयार करावा.

दरमहा 14500 कोटी रुपयांची एसआयपी योग्य

कर तज्ज्ञांच्या मते, समजा जर एखादा गुंतवणूकदार 25 वर्षांच्या वयात दरमहा 14500 कोटी रुपयांची एसआयपी सुरू करतो आणि 60 वर्षांच्या वयापर्यंत त्यात गुंतवणूक करतो आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळवतो, तर गुंतवणूकदाराकडे 22.93 कोटी रुपयांचा निधी असेल. सेवानिवृत्तीच्या वेळी एसआयपी गुंतवणूकदाराला श्रीमंत बनवू शकते. म्युच्युअल फंड बाजारातील जोखमीवर अवलंबून असतात. म्हणून निधीची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. योग्य फंडाची निवड केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

संबंधित बातम्या

तुम्ही नोकरी करत असल्यास हा फॉर्म लवकर भरा, अन्यथा 7 लाखांना मुकणार

तुम्ही कर्जाची परतफेड केलीय, मग हा कागद बँकेतून नक्की घ्या, अन्यथा…

How much to invest per month to get 23 crores till retirement ?, find out