AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही नोकरी करत असल्यास हा फॉर्म लवकर भरा, अन्यथा 7 लाखांना मुकणार

या अंतर्गत सदस्यांना 7 लाख रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण मिळतेय, यासाठी ग्राहकांना कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. परंतु या 7 लाख रुपयांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी एक फॉर्म भरणे आवश्यक आहे.

तुम्ही नोकरी करत असल्यास हा फॉर्म लवकर भरा, अन्यथा 7 लाखांना मुकणार
EDLI Scheme
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 23, 2021 | 11:46 AM
Share

नवी दिल्लीः जर तुम्ही काम करता आणि EPFO ​​चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. खरं तर कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना पीएफ आणि पेन्शन व्यतिरिक्त जीवन विम्याचे मोठे फायदे दिलेत. या अंतर्गत सदस्यांना 7 लाख रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण मिळतेय, यासाठी ग्राहकांना कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. परंतु या 7 लाख रुपयांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी एक फॉर्म भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुमच्या कुटुंबाला त्याचा लाभ घेता येणार नाही.

EPFO ही देशाची प्रमुख संस्था

यासंदर्भात सेवानिवृत्ती निधी संस्थेने अलीकडेच अधिसूचना जारी केलीय. प्रत्येकाने आपले ई-नामांकन दाखल करावे, जेणेकरून खातेदारांच्या कुटुंबाची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित होईल. EPFO ही देशाची प्रमुख संस्था आहे, जी EPF आणि MP अधिनियम 1952 च्या कायद्यानुसार संघटित/अर्ध-संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करते.

EDLI योजनेंतर्गत 7 लाख मोफत विमा उपलब्ध

? ईपीएफचे सर्व सदस्य कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना, 1976 (EDLI) अंतर्गत येतात. EDLI योजनेंतर्गत प्रत्येक EPF खात्यावर 7 लाख रुपयांपर्यंतचे विनामूल्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. ? सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते. नियोक्ता देखील 12 टक्के जमा करतो, परंतु तो दोन भागांमध्ये जमा केला जातो. कंपनी ईपीएफमध्ये 3.67 टक्के आणि ईपीएसमध्ये 8.33 टक्के रक्कम जमा करते. पीपीएफ ग्राहकांच्या नामांकित व्यक्तीला EDLI मध्ये कंपनीने जमा केलेल्या 0.5 टक्के योगदानानुसार 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.

निवृत्तीनंतर दावा करू शकत नाही

ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्ती जीवन विम्याच्या रकमेवर दावा करू शकतो. पीएफ खातेधारकांसाठी उपलब्ध असलेला हा विमा केवळ नोकरीदरम्यानच दावा करता येतो. निवृत्तीनंतर हा लाभ मिळत नाही.

ईपीएफ/ईपीएसमध्ये ई-नामांकन कसे करावे?

>> सर्वप्रथम EPFO ​​च्या अधिकृत वेबसाईट https://www.epfindia.gov.in/ वर जा. >> ‘Services’ पर्यायावर क्लिक करा आणि त्याखाली ‘For Employees’ पर्यायावर क्लिक करा. >> तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, त्यानंतर ‘Member UAN/Online Service’ पर्यायावर क्लिक करा. >> मॅनेज टॅब अंतर्गत ई-नामांकन निवडा. असे केल्याने प्रोव्हाइड डिटेल्स टॅब स्क्रीनवर दिसेल, त्यानंतर Save वर क्लिक करा. >> आता कुटुंब डिक्लेरेशनसाठी होय वर क्लिक करा, नंतर कुटुंब तपशील जोडा आणि क्लिक करा. >> येथे एकूण रकमेच्या शेअरसाठी नामांकन तपशीलांवर क्लिक करा, नंतर Save EPF Nomination वर क्लिक करा. >> ओटीपी जनरेट करण्यासाठी ई-चिन्हावर क्लिक करा, आता आधारशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी टाका. >> तुम्ही हे करताच तुमचे ई-नामांकन EPFO ​​मध्ये नोंदणीकृत होते.

संबंधित बातम्या

तुम्ही कर्जाची परतफेड केलीय, मग हा कागद बँकेतून नक्की घ्या, अन्यथा…

बँक खात्यातून 177 रुपये कापले जातायत? जाणून घ्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे का वसूल करतात?

If you are working, fill up this form early, otherwise you will lose Rs 7 lakh

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!