AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक खात्यातून 177 रुपये कापले जातायत? जाणून घ्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे का वसूल करतात?

आजकाल एक्सिस बँकेद्वारे ग्राहकांच्या खात्यातून 177 रुपये कापले जात आहेत, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या खात्यातून पैसे का कापले जात आहेत याची चिंता सतावतेय. जर तुमचे खाते अॅक्सिस बँकेतदेखील आहे आणि तुमच्या खात्यातून 177 रुपये कापले गेलेत, तर आम्ही तुम्हाला त्यासंदर्भात माहिती देणार आहोत.

बँक खात्यातून 177 रुपये कापले जातायत? जाणून घ्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे का वसूल करतात?
ONLINE PAYMENT SYSTEM
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 10:43 AM
Share

नवी दिल्लीः आता खासगी आणि सरकारी दोन्ही बँका ग्राहकांना बहुतांश बँकिंग सेवा ऑनलाईन माध्यमातून मिळत आहेत. म्हणजेच ग्राहक बँकेची अर्ध्याहून अधिक कामं घरी बसून करीत आहेत. अगदी घरूनही बँक खाते उघडता येते. मात्र, बँक या सर्व सुविधांसाठी ग्राहकांकडून शुल्कही घेत आहे. यात आजकाल एक्सिस बँकेद्वारे ग्राहकांच्या खात्यातून 177 रुपये कापले जात आहेत, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या खात्यातून पैसे का कापले जात आहेत याची चिंता सतावतेय. जर तुमचे खाते अॅक्सिस बँकेतदेखील आहे आणि तुमच्या खात्यातून 177 रुपये कापले गेलेत, तर आम्ही तुम्हाला त्यासंदर्भात माहिती देणार आहोत.

177 रुपये कशासाठी कापतात?

अॅक्सिस बँकेच्या वतीने त्या लोकांच्या खात्यातून 177 रुपये कापले गेलेत, जे बँकेच्या इंटरनेट बँकिंगचा वापर करतात. म्हणजेच बँकेने इंटरनेट बँकिंगचे शुल्क वजा केले, जे दरवर्षी बँकेने कापले. बँक दरवर्षी इंटरनेट बँकिंग खात्यातून 150 रुपये कापते आणि त्यानंतर त्यावर 18 टक्के जीएसटीदेखील आकारला जातो. याचा अर्थ बँक 150 रुपये आकारते आणि जीएसटी म्हणून 27 रुपये म्हणजेच 177 रुपये कापते. अशा परिस्थितीत जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल, तर तुमच्या खात्यातून या कारणामुळे पैसे कापले जातात.

बँक आणखी कोणते शुल्क आकारते?

? इंटरनेट बँकिंग व्यतिरिक्त बँकेकडून अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्यात एटीएम, एसएमएस शुल्क इत्यादींचा समावेश असतो. जाणून घ्या बँक किती प्रकारचे शुल्क घेते. ? बँकेकडून मर्यादित रोख व्यवहारांना परवानगी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ठरवलेल्या नियमांनुसार एका महिन्यात 4-5 व्यवहार करू शकता. यानंतरही जर तुम्ही व्यवहार करत असाल तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. सरकारी बँका साधारणपणे 20 ते 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. ? बँक तुमच्याकडून एटीएम व्यवहारांवर शुल्क आकारते. जर तुम्ही एटीएमच्या मर्यादित संख्येपेक्षा जास्त व्यवहार केले, तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. ? एटीएम कार्डच्या देखभालीसाठी दरवर्षी बँक 150 रुपयांपर्यंत शुल्क आकारते. ? बँका आता ग्राहकांकडून किमान शिल्लक न राखल्याबद्दल शुल्क आकारतात. मेट्रो, अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांमध्ये किमान शिल्लक मर्यादा आहेत. तसेच प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. ? समजा तुम्ही एटीएममध्ये गेलात आणि तुमच्या खात्यात फक्त 5000 रुपये होते आणि नंतर तुम्ही पैसे काढण्यासाठी 6000 ची विनंती केली, तर तुमचा व्यवहार अयशस्वी होईल. असे झाल्यास बँक तुमच्याकडून 20 ते 25 रुपये आकारू शकते. अशा परिस्थितीत आधी शिल्लक तपासा आणि नंतर पैसे काढा. ? NEFT आणि RTGS आता सर्व ग्राहकांसाठी मोफत आहेत. मात्र, तुम्हाला आयएमपीएस व्यवहारांसाठी शुल्क भरावे लागेल. हे सहसा 5 ते 25 रुपयांच्यादरम्यान असते.

संबंधित बातम्या

Income Tax : हे 5 मोठे नियम बदलले, आता उत्पन्नावर पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागणार

BIS ने Gold Hallmarking बाबत संभ्रम केला दूर, महासंचालकांनी दिली कामाची माहिती

Rs 177 deducted from bank account? Find out why they withdraw money from the customer’s account.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.