पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल महाग, इंधन किंमत क्रमवारीत भारत 42 वा; वाचा-जगातील पेट्रोलचे दर

| Updated on: May 17, 2022 | 11:28 PM

केंद्र-राज्य वादाचा नवा अंकही पाहायला मिळत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोल दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार ठरविलं आहे. दरम्यान, जगभरातील पेट्रोल दराची नवी आकडेवारी समोर आली आहे.

पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल महाग, इंधन किंमत क्रमवारीत भारत 42 वा; वाचा-जगातील पेट्रोलचे दर
Follow us on

नवी दिल्लीः देशातील पेट्रोलच्या किंमतीनी (PETROL PRICE) उच्चांक गाठला आहे. पेट्रोल दरवाढीवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. केंद्र-राज्य वादाचा नवा अंकही पाहायला मिळत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोल दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार ठरविलं आहे. दरम्यान, जगभरातील पेट्रोल दराची नवी आकडेवारी समोर आली आहे. जगातील काही राष्ट्रांच्या तुलनेत भारताचं पेट्रोल स्वस्त आहे. मात्र, ब्राझील, जपान, अमेरिका, रशिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या तुलनेत भारतातील पेट्रोल महाग आहे. दरडोई उत्पन्नाच्या (PER CAPITAL INCOME) आधारावर पेट्रोलच्या दराची तुलना करण्यात आली आहे. जगभरातील राष्ट्रांच्या पेट्रोल दराचा अभ्यास करण्यासाठी 106 देशांच्या दराचा आढावा घेण्यात आला. जगभरातील पेट्रोल दरांच्या क्रमवारीत (PETROL RATE RANKING) भारताचा 42 वा क्रमांक लागतो.

भारताहून महाग पेट्रोल:

जगातील 50 हून अधिक राष्ट्रांतील पेट्रोलच्या किंमती भारतापेक्षा अधिक आहे. भारतातील इंधनाचे दर ऑस्ट्रेलिया, तुर्की आणि दक्षिण कोरियाच्या समान आहे. प्रति व्यक्ती पेट्रोलचे दर व्हिएतनाम, केनिया, युक्रेन, बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यांच्यापेक्षा अधिक आहे. प्रमुख तेल उत्पादक राष्ट्रात पेट्रोलची किंमत तुलनात्मक रित्या अत्यंत कमी आहे.

गणित दरडोई उत्पन्न अन् पेट्रोलचं:

दरडोई उत्पन्नाच्या आधारावर पेट्रोल दराची तुलना केल्यास चित्र वेगळे भासते.कमी दरडोई उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रांना पेट्रोल दरवाढीचा अधिक भार सहन करावा लागतो. फिलिपिन्स राष्ट्राचे पेट्रोलचे दर तुलनात्मकरित्या भारतीय दरांशी समकक्ष आहेत. मात्र, फिलिपन्सचे दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक आहे. केनिया, बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान यांसारख्या कमी दरडोई उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रांत पेट्रोलचे दर अत्यंत कमी आहेत. मध्यवर्ती सरकारांनी पेट्रोलवरील कर कपातीच्या दिशेनं पाऊलं उचलायला हवीत असं मत समोर येत आहे.

भारताचे शेजारी राष्ट्र

भारत जगाच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकाचा पेट्रोल वापरकर्ता आणि आयातदार देश आहे. आपल्या आवश्यकतेच्या 85 टक्के पेट्रोल आयात केले जाते. त्यामुळे इंधन दरावर आयातशुल्काचा थेट परिणाम जाणवतो. राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 105.41 रुपये आहे. भारताच्या सीमावर्ती राष्ट्रांत पेट्रोलचे दर यापेक्षा कमी आहेत. बांग्लादेश मध्ये पेट्रोलचे दर 1.05 डॉलर प्रति लीटर, पाकिस्तानात 77 सेंट प्रति लीटर आणि श्रीलंकेत 67 सेंट प्रती लीटर याप्रमाणे दर आहेत.