PF UPDATE : EPFO चा कंपन्यांना मोठा दिलासा! PF रिटर्न भरण्याची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार फाइल

EPFO ने सप्टेंबर 2026 चा ECR भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपासून पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांना PF रिटर्न करण्यासाठी आणखी काही दिवस मिळणार आहेत. मात्र या मुदतवाढीचा लाभ सप्टेंबर २०२६ च्या वेतन महिन्याच्या रिटर्नसाठी लागू आहे.

PF UPDATE : EPFO चा कंपन्यांना मोठा दिलासा! PF रिटर्न भरण्याची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार फाइल
EPFO UPDATE EXTEND DATE FOR PF RETURN
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 7:55 PM

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीशी म्हणजेच PF संबंधित कामकाज करणाऱ्या कंपन्या आणि नियोक्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ( EPFO ) सप्टेंबर 2026 चा ECR भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपासून पुढे ढकलण्यात आली आहे.त्यामुळे नियोक्त्यांना आवश्यक नोंदी पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवस मिळणार आहेत.

ECR म्हणजे काय ?

ECR म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलन – कम – रिटर्न. नियोक्त्यांना EPFO च्या पोर्टलवर दर महिन्याला हा तपशील सादर करावा लागतो. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाची आणि त्यांच्याशी संबंधित योगदानाची माहिती असते. कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना (EDLI) यांच्याशी संबंधित तपशीलही त्यात समाविष्ट असतात.

Loading...

किती दिवसांची मुदत वाढवली आहे?

EPFO ने ECR भरण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 म्हणून जाहीर केली होती. पण आता हिच ताऱीख बदलून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ECR भरता येतील असे EPFO ने जाहीर केले आहे.

मुदत वाढवण्याचा निर्णय का घेतला?

वेतन मर्यांदेत झालेल्या बदलामुळे सप्टेंबर महिन्याचा ECR तयार करताना कंपन्याना अतिरिक्त वेळेची गरज होती. याआधी PF साठीची वेतन मर्यादा 15 हजार रूपये होती. 17 सप्टेंबर 2026 रोजी ती वाढवून 25 हजार रूपये करण्यात आली.

या बदलामुळे सप्टेंबर महिन्यातील योगदानाची गणना करताना जुन्या आणि नव्या मर्यादेचा विचार कराना लागत आहे. त्यामुळे वेतनाच्या नोंदी अपडेट करणे आणि योगदानाची योग्य गणना करणे यासाठी कंपन्याना अधिक वेळ मिळावा. या उद्देशाने अंतिम मुदत वाढवण्यात आली आहेय

एकूणच ECR ची मुदत वाढल्यामुळे कंपन्याना सप्टेंबर महिन्याचा PF संबंधित तपशील आणि योगदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. मात्र ही मुदतवाढ सप्टेंबर 2026 च्या ECR साठी आहे. इतर महिन्यांच्या मुदतीत बदल झालेला नाहीय

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us