PayTMसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’: शेअर्स 952 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर, गुंतवणूकदारांना शॉक

| Updated on: Jan 22, 2022 | 8:22 PM

पेटीएम शेअरचे टार्गेट प्राईस 900 रुपये निश्चित करण्यात आले आहे आणि पेटीएमचा शेअर्स टार्गेट प्राईस पर्यंत पोहोचला आहे. पेटीएमचा शेअर दोन महिन्यांपूर्वी सूचीबद्ध (लिस्टिंग) करण्यात आला होता. मात्र, घसरणीमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदारांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला

PayTMसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’: शेअर्स 952 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर, गुंतवणूकदारांना शॉक
Follow us on

नवी दिल्ली : पेटीएमच्या (Paytm) शेअर्समध्ये घसरणीचे सत्र कायम आहे. काल (शुक्रवारी) पेटीएम पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचा (One 97 Communications) शेअर्समध्ये आतापर्यंतची सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. शुक्रवारी इंटरनेट-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव कायम राहिला. पेटीएमच्या शेअर्समध्ये मागील 14 सत्रांपैकी 13 सत्रात सातत्याने घसरण होत आहे. ‘एनएसई’वर व्यवहारांच्या दरम्यान पेटीएम शेअर चार टक्क्यांच्या घसरणीसह 952 रुपयांवर पोहोचला. पेटीएम शेअर्समध्ये आतापर्यंतची सर्वाधिक घसरण ठरली आहे. आपल्या इश्यू प्राईसपेक्षा 56 टक्के घसरण ठरली आहे. पेटीएम शेअर्सची इश्यू प्राईस 2150 रुपये होती. घसरणीच्या सत्रांमुळे गुंतवणुकदारांना प्रति शेअर अंदाजित 1200 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीच्या मार्केट कॅप घसरणीसह 62,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

इंटरनेट आधारित शेअर्समध्ये घसरण-

आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी पेटीएम सोबत अन्य टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली. झोमॅटो (Zomato),पीबी फिनटेक (PB Fintech)आणि कार ट्रेडचे (Car Trade) शेअर्स गडगडले. झोमॅटोच्या शेअर्समध्ये सहा टक्के, पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये पाच टक्के आणि कारट्रेडच्या शेअर्समध्ये एक टक्के घसरण दिसून आली. नायकाच्या शेअर्समध्ये देखील एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

टार्गेट प्राईसपर्यंत घसरण-

पेटीएम शेअरचे टार्गेट प्राईस 900 रुपये निश्चित करण्यात आले आहे आणि पेटीएमचा शेअर्स टार्गेट प्राईस पर्यंत पोहोचला आहे. पेटीएमचा शेअर दोन महिन्यांपूर्वी सूचीबद्ध (लिस्टिंग) करण्यात आला होता. मात्र, घसरणीमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदारांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आणि अद्यापही शेअर्स इश्यू प्राईस पर्यंत पोहोचू शकलेला नाही.

कोल इंडियापेक्षा मोठा IPO

पेटीएमचा आयपीओ सर्वात मोठा ठरला होता. पेटीएमने सुरुवातीच्या आठवड्यात गुंतवणूकदारांकडून 8,235 कोटी रुपये उभे केले होते. पेटीएमची सुरुवात एक दशकापूर्वी अलीगडमधील एका शिक्षकाच्या मुलाने सुरू केले होते. ज्याने मोबाईल फोन रिचार्ज करण्यास सुरुवात केली होती. पेटीएमचे मूल्य $16 अब्ज आहे. ही कंपनी 2010 मध्ये सुरू झाली. ही भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक आहे. One97 Communications चे संस्थापक आणि CEO पेटीएम IPO मध्ये 402 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीचे उदिष्ट ठेवले होते.

संबंधित बातम्या :

Budget 2022: ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल, बजेटमध्ये ‘डिजिटल फंड’?

नोकरी गमावण्याची चिंता विसरा ; जॉब इन्शुरन्स घ्या आणि निर्धास्त व्हा 

Budget 2022 : शेअर गुंतवणुकदारांना कर दिलासा की बोजा; टॅक्सचा ट्रिपल डोस हटविणार?