Anand Mahindra Birthday : देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे आनंद महिंद्रांचा आहे आज ‘ब’ डे

| Updated on: May 01, 2022 | 5:00 AM

आनंद महिंद्रा यांचे वैयक्तिक आयुष्य पाहता ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या कंपनीची नवीन धोरणे, ऑटो जगतातील नवीन मॉडेल्सचे लाँचिंग आणि क्रीडा जगताशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल तो ट्विटरवर सक्रिय असतो. आज ट्विटरवर त्याचे 8.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Anand Mahindra Birthday : देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे आनंद महिंद्रांचा आहे आज ब डे
उद्योगपती आनंद महिंद्रा
Image Credit source: tv9
Follow us on

Anand Mahindra Birthday : भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (industrialist Anand Mahindra) त्यांचा आज 67 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1 मे 1955 रोजी मुंबईत महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध व्यापारी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरीश महिंद्रा आणि आईचे नाव इंदिरा महिंद्रा होते. तर आनंद यांचे हार्वर्ड विद्यापीठ (Harvard University) आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकले आहेत. तर आनंद महिंद्रा हे ऑटो विश्वातील एक मोठे नाव आहे. जे देशातील आणि जगातील बड्या उद्योगपतींमध्ये आदराने घेतलं जातं. तर ते आपल्या आजोबांनी सुरू केलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra Company) चालवतात. इतकेच काय तर आनंद महिंद्र हे सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी सोशल मिडियावरून अनेक युजर्स यांना रिप्लाय दिला असून जुगाडू लोकांच्या चारचाकीच्या इच्छा पुर्ण केल्या आहेत. त्यामुळे आनंद महिंद्रांना तळागाळातील आणि ग्रामिण भागातील जनताही आपले मानते. आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष असून ज्याची कमाई ही $21 अब्ज डॉलर्स आहे. तर कृषी व्यवसायापासून ते एरोस्पेसपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये उपस्थिती आहे.

फोर्ब्स इंडियाचा ‘उद्योजक ऑफ द इयर’ आणि पद्मभूषण पुरस्कार

2013 साठी त्यांना फोर्ब्स इंडियाचे ‘उद्योजक ऑफ द इयर’ म्हणूनही पुरस्कार दिला आहे. तर त्यांना जानेवारी 2020 मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी भारतीय स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. ज्यात काही डिजिटल न्यूज वेबसाइट SheThePeople, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LocalCircles, Foodtech स्टार्टअप DishCo, शैक्षणिक कंपनी नांदी एज्युकेशन सपोर्ट अँड ट्रेनिंग (NEST), असिस्टेड लर्निंग स्टार्टअप थिंकरबेल लॅब्स इ. तर 1996 मध्ये, त्यांनी नन्ही कली या गैर-सरकारी संस्थेची स्थापना केली जी भारतातील वंचित मुलींच्या शिक्षणासाठी मदत करते.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा पाया

त्यांचे आजोबा जगदीश चंद्र आणि कैलाश चंद्र यांनी पंजाबमधील लुधियाना येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा पाया घातला होता. जो आज आनंद महिंद्रा वारसा म्हणून पुढे नेत आहे. आनंद हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्य आहेत जे ही कंपनी चालवत आहेत. आज, महिंद्रा ट्रॅक्टर, महिंद्रा बोलेरो, महिंद्रा एक्सयूव्ही, महिंद्रा स्कॉर्पिओ सारखी अनेक यशस्वी वाहने कंपनीच्या युनिटमध्ये बनविली जातात. वाहन क्षेत्राव्यतिरिक्त, महिंद्रा समूह कोटक महिंद्रा बँक, पर्यटन, पायाभूत सुविधा, ट्रेंडिंग आणि लॉजिस्टिक्स सेवा यासारख्या वित्तीय सेवांमध्ये देखील उतरत आहे.

हे सुद्धा वाचा

आनंद महिंद्रा फॅमिली

आनंद महिंद्रा यांच्या आजोबांचे नाव जगदीश चंद्र महिंद्र होते, ते महिंद्रा आणि महिंद्राचे सह-संस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे नाव हरीश महिंद्रा होते, ते एक प्रसिद्ध उद्योगपती होते. आणि आईचे नाव इंदिरा महिंद्रा होते. आनंद महिंद्रा यांना राधिका नाथ आणि अनुजा शर्मा या दोन बहिणी आहेत. आनंदजींच्या पत्नीचे नाव अनुराधा महिंद्रा आहे, त्या MEN’S world किंवा Verve मासिकांच्या प्रसिद्ध संपादक आहेत. त्यांना दोन मुली आहेत, ज्यांची नावे आलिका महिंद्रा आणि दिव्या महिंद्रा आहेत.

कोटक महिंद्रा न्यूचा पाया

आनंद महिंद्रा यांना वारसाहक्काने व्यवसाय मिळाला आहे. आजोबांच्या पश्चात वडील हरीश महिंद्रा आणि आई इंदिरा महिंद्रा हा व्यवसाय सांभाळत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आनंद महिंद्राही आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. आपल्या कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी 1997 मध्ये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होण्याचा मान मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ते 2003 साली कंपनीचे उपाध्यक्ष बनले आणि त्याच सालात त्यांनी कोटक महिंद्रा न्यूचा पाया घातला.

स्टार्टअप हात

आनंद महिंद्रा हे कायम स्टार्टअप हात देत आले आहेत. त्यांच्या अनेक घटनातून ते समोर आले ही आहे. मग ती महाराष्ट्रातील सांगलीची घटना असो की मग देशातील इतर. त्यांनी जुगाडू लोकांच्या कार्याचे कायम कौतुक केले आहे. तर त्यांनी योग्य मार्ग मिळावी म्हणून हात ही दिला आहे. तसेच त्यांना नवीन काही करण्याचे आणि नवीन कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची आवड आहे. असतो याशिवाय महिंद्रा सामाजिक कार्यातही योगदान देते.

सोशल मीडियावर खूप सक्रिय

आनंद महिंद्रा यांचे वैयक्तिक आयुष्य पाहता ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या कंपनीची नवीन धोरणे, ऑटो जगतातील नवीन मॉडेल्सचे लाँचिंग आणि क्रीडा जगताशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल तो ट्विटरवर सक्रिय असतो. आज ट्विटरवर त्याचे 8.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याला क्रिकेट आणि फुटबॉलची आवड आहे. यासोबतच त्याला भारतातील प्रो कबड्डी लीगचे शिल्पकार देखील म्हटले जाते.

Oxygen on Wheels

कोविड-19 च्या स्थितीत, महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रात ऑक्सिजन सिलिंडर हस्तांतरित करण्यासाठी 50-70 बोलेरो ट्रक उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर हस्तांतरित केले होते. आनंद महिंद्रा यांनी पीडित लोकांना मदत करण्यासाठी हे एक चांगले पाऊल उचलले होते.

अनेक सन्मान

एक उद्योगपती आणि जबाबदार नागरिक म्हणून आनंद महिंद्रा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये 2004 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ विशेष सन्मान, 2005 मध्ये ‘राजीव गांधी पुरस्कार’, ‘पर्सन ऑफ द इयर’ ऑटो मॉनिटर आणि ‘लीडरशिप अवॉर्ड’ अमेरिकन इंडिया फाऊंडेशन, 2005 मध्ये ‘सीएनबीसी एशिया बिझनेस लीडर’ 2006 चा पुरस्कार, ‘लुधियाना मॅनेजमेंट असोसिएशन’चा ‘आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर अवॉर्ड’, 2007 मध्ये ‘एनडीटीव्ही प्रॉफिट’ तर्फे ‘मोस्ट इन्स्पिरेशनल कॉर्पोरेट लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार, 2008-2009 मध्ये बिझनेस लीडर म्हणून ‘इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड’. याशिवाय त्यांच्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’ला ‘जपान गुणवत्ता पदक’ मिळाले आहे. हा बहुमान मिळवणारी ही जगातील एकमेव ट्रॅक्टर कंपनी आहे. डेमिंग पारितोषिक जिंकणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे.