RBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा

| Updated on: Dec 15, 2019 | 6:06 PM

एका बँकेतून दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे ट्रान्सफर करणे येत्या सोमवारपासून सोपे होणार (NEFT money transfer available 24 hours) आहे.

RBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ही सुविधा
ऑफिसर ग्रेड-बीच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर
Follow us on

नवी दिल्ली : एका बँकेतून दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे ट्रान्सफर करणे येत्या सोमवारपासून सोपे होणार (NEFT money transfer available 24 hours) आहे. कारण ग्राहकांना नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) सुविधा आता 24 तास मिळणार आहे. नुकतंच रिझर्व्ह बँकेने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ग्राहकांना आठवड्यातील सात दिवसात कधीही पैसे ट्रान्सफर करता येणार (NEFT money transfer available 24 hours) आहे.

आरबीआयने याबाबतची माहिती बँकांना पत्राद्वारे कळवली आहे. यानुसार बँकेतून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे ट्रान्सफर करताना कोणतीही अडचण होणार नाही. दरम्यान याबाबत संबंधित बँकानाही याची काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.

NEFT ही सुविधा एका बँकेतून दुसऱ्या बँकेतील खातेदाराच्या पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते. NEFT द्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही 2 लाखापर्यंत रोख रक्कम दुसऱ्याच्या अकाऊंटमध्ये पाठवू शकता. आतापर्यंत सकाळी 8 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत NEFT द्वारे पैसे पाठवण्यात येत होते. तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंतच NEFT चा वापर करता येत होता. मात्र आता या सुविधेचा वापर ग्राहकांना दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस करता येणार (NEFT money transfer available 24 hours) आहे.

दरम्यान आरबीआय NEFT आणि RTGS द्वारे पैसे पाठवताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. तर IMPS द्वारे आताही बँकेतून पैसे पाठवताना ठराविक रक्कम घेतली जाते. तसेच IMPS द्वारे फक्त काही ठराविक रक्कमच ट्रान्सफर करता येते. तर RTGS द्वारे आपण मोठी रक्कम ट्रान्सफर करु शकता.

मात्र आता NEFT सुविधा ग्राहकांना 24 तास घेता येणार आहे. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना ग्राहकांसमोरील अडचणी दूर होणार आहे